नाशिक : गंगापुर धरणाच्या बॅकवॉटरजवळील मौजे सावरगाव शिवारात शनिवारी (दि.२८) मध्यरात्री उशिरापर्यंत सुरु असलेली 'हायप्रोफाईल हुक्का पार्टी' ग्रामीण पोलिसांनी उधळली. मोठ्या संख्येने लोक एका फार्महाऊसमध्ये एकत्र येत हुक्क्याचा धूर सोडत धिंगाणा घालत असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होत धाड टाकली.गंगापुर धरणाच्या बॅक वॉटरजवळील विविध गावांमध्ये अलिकडे 'नाईट पार्टी कल्चर'च्या नावाखाली मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊसमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करत उच्चभ्रूंचा धिंगाणा सुरु राहत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या पार्टी कल्चरमुळे कोरोनाच्या प्रादूर्भावाला हातभार गावपातळीवर लागण्यास मदत होत असल्याचेही बोलले जात आहे. सरकारी यंत्रणेने याकडे वेळीच लक्ष पुरवून कारवाईची मागणी होत होती. शनिवारी अशाचप्रकारे सावरगावात रंगलेल्या हुक्का पार्टीची 'दुर्गंधी' थेट ग्रामिण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यापर्यंत येऊन पोहचली. पाटील यांनी स्वत: तत्काळ आपल्या विशेष पथकासह स्थानिक गुन्हे शाखा, तालुका पोलिसांना ह्यकॉलह्ण देत सावरगावमधील ह्यइलाकाह्ण नावाचे रेस्टॉरंट व फार्महाऊसवर रात्री ११ वाजेच्या सुमारास छापा मारला. हॉटेल व फार्महाऊस मालक गौरव मधुकर मौले यांच्यासह तेथील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचाही संशयित आरोपींमध्ये सहभाग आहे. तंबाखुजन्य पदार्थांचा साठा व हुक्का पिण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले असून सुमारे २ लाखाांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.फार्महाऊसमध्ये हुक्क्यासारख्या प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करताना आढळून आलेल्या १७ संशयितांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात कोटपा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा व कोरोनाचे निर्बंधांचा भंग केल्याप्रकरणी ४२ लोकांविरुध्द कलम-१८८नुसार कारवाई करण्यात आली आहे. एका संशयिताने वाहनात लपून पोलिसांच्या कारवाईतून निसटून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही पोलिसांनी त्याचा पाठलाग करत अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने वाहन थांबविले नसल्याने त्याच्याविरुध्द शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फार्म हाऊसवर छापा : हायप्रोफाईल हुक्का पार्टी ग्रामिण पोलिसांनी उधळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 3:44 PM
गंगापुर धरणाच्या बॅक वॉटरजवळील विविध गावांमध्ये अलिकडे 'नाईट पार्टी कल्चर'च्या नावाखाली मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊसमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करत उच्चभ्रूंचा धिंगाणा सुरु राहत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
ठळक मुद्देसर्रासपणे नियमांचा भंगशासकिय कामात अडथळा५९ संशयितांविरुध्द कारवाई