कार्यक्र माचे अध्यक्ष सर्जेराव पाटील होते. मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाविस्कर, डॉ. पगार, माणिक कवडे, सचिन साळवे,तुषार पांडे, सुरेश शेळके, संदीप जेजुरकर, मारु ती जगधने, संजय मोरे, आर.टी.देवरे,आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी कवी होळकर यांनी सांगितले अनुभव व निरीक्षण, यांच्या माध्यमातून कविता जन्म घेत असते. हे स्वत:च्या झूला या कवितेची निर्मिती मुलींच्या एक लिंबु झेलु बाई, दोन लिंबु झेलु या खेळाच्या निरीक्षणातुन झाल्याचे स्पष्ट केले. लोकगीते, लोककथा भारु ड, ग्रामीण जीवनातील अनुभव व कला जोपासा म्हणजे तुम्ही सकस कवीता लिहु शकाल असे ते म्हणाले. प्रास्ताविक स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.संजय मराठे यांनी केले. प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा सादर केला. क्रि डा व सांस्कृतिक स्पर्धाचे बक्षीस वितरण प्रमुख अतिथीच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालनसुरेश नारायणे व उषा शिरोडे यांनी केले. सोलो डान्स रु पाली महाजन, धनगरी गीत कार्तिक औशिकर तर लावणी जागृती जाधव यांनी सादर केली. शेलापागोट्याचा कार्यक्र म पार पडला. संदिप दौड,निकम ,पी.डी.पवार,वाघ,आदिंनी वाचन केले.जावेद शेख यांनी आभार मानले.