सटाणा: तालुक्यात ऐन रब्बी हंगामात विजेचा खेळखंडोबा झाला असून रोहित्र जळाल्याचे प्रकार दररोज घडत आहे. पंधरा पंधरा दिवस रोहित्र मिळत नसल्याने रब्बीचे पिके धोक्यात आली असुन रोहित्र तत्काळ मिळावे या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.१९) अकरा वाजता करंजाडजवळ चक्काजाम करून शिर्डी-साक्र ी महामार्ग एक तास रोखून धरला . वीज महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी चोवीस तासात रोहित्र बदलून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बागलाण तालुक्यातील वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराला शेतकरीत्रस्त झाले आहेत .ऐन कांदा लागवडीत सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यामुळे अनेक शेतकºयांचे कांदा रोपे पाण्या अभावी करपून गेले आहे .गहू ,हरभर्याची देखील हीच अवस्था आहे .ज्या भागात सुरळीत वीज आहे त्या ठिकाणी मात्र रोहित्र मोठ्याप्रमाणात जळत आहेत .पंधरा पंधरा दिवस रोहित्र जळूनही वीज कंपनीकडून रोहित्र बदलून दिले जात नाही .त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे .करंजाड येथील कृषीचे रोहित्र जळून पंधरा दिवस उलटले तरी अद्याप रोहित्र बदलून मिळत नसल्यामुळे संतप्त करंजाड येथील शेतकºयांनी बिंदू शर्मा .सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता करंजाड बसस्थानका समोर चक्काजाम करून शिर्डी-साक्र ी महामार्ग एक तास रोखून धरला .आंदोलनाची माहिती मिळताच वीज महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुनील बोंडे यांनी तत्काळ आंदोलन करणार्या शेतकर्यांशी संपर्क साधून चोवीस तासात रोहित्र बदलण्याचे आश्वासन दिले .तसेच ज्या ठिकाणी अतिरिक्त विजेचा भार आहे .अशा ठिकाणच्या रोहीत्रांची क्षमता वाढविण्यात येईल असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले .त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .आंदोलनात पंडित देवरे ,मालती देवरे राकेश देवरे ,मधुकर शेवाळे ,दिलीप शेवाळे ,अनिल शेवाळे .घनशाम शेवाळे ,जगन अहिरे ,दादा शेवाळे ,शरद शेवाळे ,साधू शेवाळे ,सयाजी अहिरे पोपट शेवाळे आदी शेतकरी सहभागी झाले होते .
रोहित्रासाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 3:14 PM