मनमाड: येथून जवळच असलेल्या माळेगाव (कर्यात) गावातील युवा शेतकरी किरण दतू उगले (३०) यांनी कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीमुळे पिके उध्वस्त झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. उगले यांना साडेतीन एकर शेती असून सध्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील कांदे व मका ही पिके हातची गेल्याने ते हवालदिल झाले होते. त्यांच्यावर बँकेचे व हात उसनवार घेतलेले कर्ज असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.
माळेगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 12:40 PM