नांदगांव : कर्जाला कंटाळून जळगांव बु येथील शेतकरी भाऊसाहेब आनंदा सांगळे (३०) यांनी स्वत:च्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सुञाकडुन मिळाली आहे. सांगळे यांच्याकडे तीन वर्षापासून देना बँकेचे आणि खासगी असे सुमारे अडीच लाख रु पये कर्ज असून ते अल्पभुधारक आहेत. यावर्षी तर त्यांची सर्वच पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे आता बँकेचे व इतर खासगी देणे कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी मन्याड फाट्याजवळील स्वत:च्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. ते दुपारी शेतावर गेले पण दुपारच्या जेवणाला घरी का आले नाही, याचा शोध त्यांचे वडील आनंदा सांगळे यांनी घेतला असता एक चप्पल विहिरीच्या किनाºयावर व दुसरी चप्पल विहिरीच्या पाण्यावर दिसून आली. पुढे शोध घेतला असता मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. यावेळी सर्पमित्र प्रभाकर निकुंभ व बेलेश्वर ग्रुप आणि पोलीस यांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढला. या घटनेमुळे जळगाव बु गावावर शोककळा पसरली आहे.
नांदगाव तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 2:48 PM