बत्तासे यांनी युको बँक शाखा गिरणारे येथून शेतीसाठी कर्ज घेतले होते. पण चार वर्षांत शेतीपासून काहीच उत्पन्न न मिळाल्याने बँकेचा एकही हप्ता ते भरू शकले नाही. बँकेचे सारखे तगादे सुरू असल्याने दि. ७ जुलै रोजी त्यांनी धोंडेगाव येथील शेत गट नं.१४४ अ मध्ये काम करत असताना विषारी औषध घेतले. ही माहिती त्यांचा लहान भाऊ संतोष अशोक बत्तासे यास कळताच त्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. औषधोपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे. याबाबत हरसूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पोटकुळे करत आहेत.
-----------------------
निसर्गाचा लहरीपणा
शेती विकसित करण्यासाठी युको बँकेतून बत्तासे यांनी सहा लाखांचे कर्ज घेतले होते. शेतीचे बांध घालणे, सपाटीकरण आदी सुविधा केल्या. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे बँकेच्या कर्जाचे हप्ते भरण्याइतपतही शेतातील उत्पादन निघाले नाही. तब्बल चार वर्षांत बँकेचा एकही हप्ता भरू न शकल्याने उद्धव बत्तासे यांनी टोकाचा निर्णय घेत जीवनयात्रा संपविली. (१० उद्धव बत्तासे)
100721\10nsk_8_10072021_13.jpg
१० उद्धव बत्तासे