कंधाणे,ता बागलाण : कांदा पिकाला पाणी देण्यासाठी शेतातील विद्युत पंप चालू करत असतांना विजेचा शॉक लागून अशोक यादव बिरारी (५५) या अल्पभूधारक येथे सोमवारी रात्री शेतक-याचा मृत्यू झाला.शेतात लागवड झालेल्या कांदा पिकाला पाणी देण्यासाठी रात्री विद्युतपंप चालू करत असतांना विद्युत पोलच्या पेटीला करंट उतरल्याने अशोक बिरारी यांना ्र विजेचा शॉक लागला. घरातील सदस्यांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने सटाणा येथे उपचारासाठी दाखल केले पण उपचार आधीच त्यांची प्राणज्योत मावळली. सटाणा येथील ग्रामीण रूग्णालयात त्यांच्यावर शवविच्छेदन करून कंधाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,वडील,दोन मुले, पत्नी,असा परिवार आहे.परिसरात शेती पंपासाठी आठवडयातून तीन दिवस रात्री थ्री फेज सप्लाय मिळत असल्याने शेतक-यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे.रात्री अपरात्री येणा-या विद्युतपुरवठयामुळे शेतक-यांना शेतिपकांना पाणी देण्यासाठी रात्रि चा दिवस करावा लागत आहे.सध्या परिसरात कांदा लागवड चालू असून उन्हाचा प्रकोप वाढल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे. आधिच दुष्काळ त्यातच रात्रीच्या भारिनयमन यामुळे येथील शेतक-यांना वैतागला आहे. असून रात्री चे भारिनयमन बंद करून शेतीपंपासाठी दिवसा विद्युत पुरवठा करण्याची मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे .गेल्या दोन महीन्यात कंधाणेतील तीन शेतक-यांचा आकस्मित निधन झाल्याने गावातील यंदाच्या दिपावली वर दु:खाची छाया पसरली आहे.
कंधाणेत विद्युत शॉक लागून शेतक-याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 3:20 PM
कंधाणे,ता बागलाण : कांदा पिकाला पाणी देण्यासाठी शेतातील विद्युत पंप चालू करत असतांना विजेचा शॉक लागून अशोक यादव बिरारी (५५) या अल्पभूधारक येथे सोमवारी रात्री शेतक-याचा मृत्यू झाला.
ठळक मुद्दे विद्युत वितरण:दिवसा विद्युत पुरवठा होत नसल्याने दुर्घटना