शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

कर्जमाफीपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:11 PM

सरकारने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजनेच्या संकेतस्थळावर निफाड तालुक्यातील चांदोरी, दारणासांगवी, नारायणगाव, गोंडेगाव यासह तेरा गावे दिसत नसल्याने कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसूनदेखील अर्ज दाखल करता येत नसल्याने या गावांतील शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागणार असल्याने संताप व्यक्त होत आहे. सदर संकेतस्थळावर संंबंधित गावे त्वरित अपलोड करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.

सायखेडा : सरकारने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजनेच्या संकेतस्थळावर निफाड तालुक्यातील चांदोरी, दारणासांगवी, नारायणगाव, गोंडेगाव यासह तेरा गावे दिसत नसल्याने कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसूनदेखील अर्ज दाखल करता येत नसल्याने या गावांतील शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागणार असल्याने संताप व्यक्त होत आहे. सदर संकेतस्थळावर संंबंधित गावे त्वरित अपलोड करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.सन २०१६ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी दीड लाख रुपये प्रत्येकी कर्जमाफी सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना कर्जमाफीची मागणी आॅनलाइन पद्धतीने करावी व जे शेतकरी आॅनलाइन अर्ज दाखल करतील त्यांनाच कर्जमाफीची आवश्यकता आहे, असे गृहीत धरून त्यांनाच कर्जमाफी देण्यात येईल, असा फतवा काढला असल्याने सॉफ्टवेअरद्वारे विशिष्ट संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करावयाचा आहे. त्या प्रक्रि येत आपले गाव, आपण कर्ज घेतलेल्या सहकारी संस्था, बँकांची नावे अगोदर वेबसाइटवर समाविष्ट करण्यात आली आहे. वेबसाइट खुली केली असता निफाड तालुक्यातील चांदोरी, नारायणगाव, दारणासांगवी, गोंडेगाव, यासह तेरा गावांची नावे येत नसल्यामुळे कर्जमाफीचा अर्ज दाखल करता येत नाही. गावाचे नाव नसल्याने पुढील माहिती भरता येत नाही. गावातील थोडेफार शेतकरी कर्जमाफीत बसत असले तरी त्यांनाही लाभ मिळणार नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज भरून शासनाच्या विशिष्ट अपलोड करण्यासाठी निश्चित केलेल्या प्रक्रियेत या गावांची नावे का येत नाही याची चौकशी करून सदर नावे यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. मुदत संपण्याअगोदर प्रक्रिया पूर्ण करावी. या संदर्भात तहसील कार्यालयास कळविले असूनही कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने संतप्त शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.