शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

आंबेगाव सोसायटीवर शेतकरी विकास पॅनल

By admin | Published: February 25, 2016 10:40 PM

आंबेगाव सोसायटीवर शेतकरी विकास पॅनल

 येवला : तालुक्यातील आंबेगाव विविध कार्यकारी सहकारी (विकास) सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी ११ जागांवर विजय मिळविला, तर श्री विजय पॅनलला दोन जागा मिळाल्या.माजी सरपंच आनंदा गिते व माजी सदस्य अशोक गिते, सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने ११ जागांवर विजय मिळविला. माजी सदस्य मनोज गिते व माणकिराव गिते यांच्या नेतृत्वाखाली श्री विजय पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले.सर्वसाधारण गटातून विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- कारभारी आव्हाड (११३), लक्ष्मण आव्हाड (११२), संजय आव्हाड (११०), आनंदा गिते (१३६), सुरेश काळे (१२१), सोमनाथ सांगळे (१३२), पुंडलिक सोनवणे (१२०) हे सर्व उमेदवार शेतकरी पॅनल. राजेंद्र दराडे (११३) श्री विजय पॅनल.शेतकरी विकासचे मधुकर धात्रक व संजय आव्हाड यांना समान ११० मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली. यात संजय आव्हाड विजयी झाले. इतर उमेदवारांना मिळालेली मते, गोविंद आव्हाड (१०७), मधुकर आव्हाड (८८), संजय आवटे (१०२), निवृत्ती काळे (१००), संपत ओझरकर (१००), रतन सोनवणे (१०८), नाना सुराडे (१०९),भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग गटातून शेतकरी विकास पॅनलचे पुंडलिक गिते (१२०) यांनी श्री विजयचे माणकिराव गिते (१०८) यांचा पराभव केला. महिला राखिव गटातून श्री विजय पॅनलच्या सुमनबाई गिते (१२३) व शेतकरी विकासच्या लहानूबाई आव्हाड (१२०) यांनी कविता काळे (११४) व शांताबाई आव्हाड (१००) यांचा पराभव केला. अनुसूचित जाती-जमाती गटातून शेतकरी विकासचे रामचंद्र भालेराव (१३०) यांनी श्री विजय पॅनलचे उत्तम भालेराव (१०२) यांचा पराभव केला. इतर मागास प्रवर्गातून शेतकरी विकासचे दत्तू सुराडे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शेतकरी विकासचे नेते आनंदा गिते, अशोक गिते, विलास गिते, नारायण गिते, अनिल गिते, घनश्याम काळे, नितीन काळे, एकनाथ आव्हाड, पंडीत आव्हाड, संपत राजोळे, नंदु सुराडे, शिवाजी सोनवणे तर श्री विजय पॅनलचे नेते निवृत्ती सोनवणे, शांताराम गिते, मनोज गिते, माणकि गिते, शिवाजी आव्हाड, रतन सोनवणे, राजू काळे आदिंसह मतदार उपस्थित होते.