शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

शेतकरी विकास पॅनलची बाजी

By admin | Published: August 29, 2016 1:47 AM

वावी सोसायटी : विजय काटे गटाचा दणदणीत विजय; राजेभोसले गटाचा दारुण पराभव

वावी : सिन्नर तालुक्यातील संवदेनशील समजल्या जाणाऱ्या वावी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपसरपंच व विकास संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विजय काटे यांच्या शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून सत्ता राखण्यात यश मिळविले. विरोधी परिवर्तन पॅनलचे नेते सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राजेभोसले गटाचा दारुण पराभव झाला. राजेभोेसले यांच्या परिवर्तन पॅनलला एकही जागा मिळविता आली नाही. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ग्रामसभेत विकास संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काटे व राजेभोसले गटात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही गटाने एकमेकांविरोधात अपहरणाच्या तक्रारी दिल्याने दोन्ही गटाच्या २६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे निवडणुकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रणजित आंधळे यांनी शेवटचे दोन दिवस चोख बंदोबस्त ठेवून निवडणूकप्रक्रिया शांततेत पार पाडली. रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ५२३ पैकी ४८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ताबडतोब मतमोजणी करण्यात आली. सर्वसाधारण गटात शेतकरी विकास पॅनलचे विजय भीमराव काटे (२६६), संतोष किसन कर्पे (२५४), विजयकुमार भगीरथ जाजू (२४७), ज्ञानदेव गंगाधर काटे (२३७), संतोष चंद्रभान काटे (२३४), दिनकर रघुनाथ वेलजाळी (२२९), आनंदा तुकाराम शेलार (२२५) व सुधाकर कारभारी उगले (२१८) विजयी झाले, तर परिवर्तन पॅनलचे नंदकिशोर मालपाणी, चांगदेव पठाडे, विठ्ठल राजेभोसले, राजेंद्र संधान, इलाहीबक्ष शेख, अशोक ताजणे, दशरथ वेलजाळी, नामदेव वेलजाळी यांचा पराभव झाला. महिला राखीव गटात शेतकरी विकास पॅनलच्या कल्पलता कारभारी वेलजाळी व मंदा भागवत वैराळ यांनी परिवर्तन पॅनलच्या यमुनाबाई पांडुरंग नवले व ताराबाई कचरू शिंदे यांना पराभूत केले. भटक्या विमुक्त गटात सोमनाथ केदू कांदळकर यांनी जनार्दन भानुदास रहाटळ यांचा पराभव केला. इतर मागास प्रवर्गात संजय रामनाथ वेलजाळी यांनी ज्ञानेश्वर पंढरीनाथ गलांडे यांचा, तर अनुसूचित जाती जमाती गटात नवनाथ तुकाराम घेगडमल यांनी रामदास मल्हारी घेगडमल यांचा पराभव केला. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. यावेळी सभापती संगीता काटे, माजी सरपंच चंद्रकांत वेलजाळी, रामनाथ कर्पे, सरपंच मंगल वेलजाळी, प्रशांत कर्पे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)