ठळक मुद्दे कायमस्वरूपी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.
मेशी : येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी व शेळी जखमी झाल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळी असलेल्या इतर शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली.मेशी फाटा येथील खंडू उखा जाधव (३०) त्यांच्या मक्याच्या शेतात काम करत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. जाधव यांच्या छातीवर बिबट्याने जखम केली आहे. इतर शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्यााने एका शेळीवरही हल्ला केला व तेथून धूम ठोकली. जखमी शेतकºयास उपचारासाठी मालेगाव शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवसांपासून मेशीसह परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी दहशतीखाली असून, वनविभागाने कायमस्वरूपी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.