इगतपुरी : तालुक्यातील कांचनगाव, तळोघ व औचितवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत दिग्गजांना धक्का देत शेतकरी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. आगरी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गणपत कडू व तालुकाध्यक्ष विठ्ठल लंगडे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच तरुण उमेदवारांना मतदारांनी कौल दिला.निवडणुकीत सर्वसाधारण गटातून भास्कर गव्हाणे, ठकाजी कडू, ओबीसी गटातून देवराम गव्हाणे, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून देवीदास लंगडे, अनुसुचित जाती गटातून शैलेश चंद्रमोरे, आदिवासी राखीव गटातून संदीप रावते व आदीवासी महीला राखीव गटातून वनीता पोरे असे सातही उमेदवार विजयी झाले. निवडून आलेल्या विजयी उमेदवारांचे तळोघचे ग्रामपंचायत सदस्य मदन कडू, आगरी सेनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल लंगडे, संपत डावखर, सरपंच रामदास गव्हाणे, शिवसेनेचे युवानेते बाळा गव्हाणे, विठोबा पाटील गव्हाणे, माजी सरपंच नंदू पाटील माळी, सोमनाथ, लालू दुभाषे, रविकांत कडू, जनार्दन लंगडे, शिवाजी लंगडे, बेंडू फोडसे, जालिंदर लंगडे, शंकर म्हात्रे, श्याम गव्हाणे, उत्तम गव्हाणे, मच्छिंद्र कडू, बाळू कडू, संजय माळी, नामदेव गव्हाणे, राजाभाऊ गव्हाणे, सुभाष लंगडे, तानाजी लंगडे, देवा लंगडे, परमेश्वर लंगडे, एकनाथ लंगडे, नामदेव कडू आदिंनी शुभेच्छा दिल्या आहेत. (वार्ताहर )
कांचनगाव सोसायटीत शेतकरी पॅनलची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2016 11:51 PM