नाशिक : शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, विषारी औषध सेवन केल्याने उपचार घेत असलेल्या दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील तुकाराम अर्जुन गायकवाड या शेतकºयाचे निधन झाले. मे महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत पाच शेतकºयांनी आत्महत्या केली असून, आजवर ३४ शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.कर्जबाजारीपणा व शेतमालाला भाव मिळत नसल्याच्या कारणावरून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण थांबण्यास तयार नाही. दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील तुकाराम अर्जुन गायकवाड (४७) या शेतकºयाने १२ मे रोजी विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांच्या तत्काळ ही बाब लक्षात आल्याने त्यांना ननाशी आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे असा परिवार आहे. तुकाराम गायकवाड यांच्या नावे वनारे येथे गट नंबर २५२ क्षेत्र असून, सातबारा उताºयाप्रमाणे ४ हेक्टर ८१ आर जमीन आहे. या संदर्भातील अहवाल तलाठ्यांनी तहसीलदारांना पाठविंला आहे. गायकवाड यांच्या नावे कर्ज होते किंवा नाही याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान मे महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत पाच शेतकºयांनी आत्महत्या केली असून, जानेवारीपासून आजपावेतो आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ३४ वर पोहोचली आहे.