जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील सातारे येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम २०२० अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात होते.सदर शेतकरी प्रशिक्षणामार्फत प्रथम माऊली पठारे यांच्या कांदा पिकाच्या प्लॉटवर जाऊन कांदा पिकाची निरीक्षणे घेण्यात आली, त्यानंतर सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे राजेंद्र हांडोरे यांनी माती नमुना कसा काढावा, माती व पाणी नमुना तपासणी चे फायदे व त्याचा आपल्या पिक उत्पादनावर होणार परिणाम याविषयी मार्गदर्शन केलेतालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी रासायनिक खते व जैविक खते यांचा पिकांत वापर त्यांचे प्रमाण व माती नमुना तपासणी च्या अहवालानंतर खतांचा करावयाचा वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, प्रकाश जवणे यांनी कांदा पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांचे प्रकार व त्यांचे नियंत्रण तसेच आजची कांदा पिकांत येणारी अडचण याविषयी मार्गदर्शन केले, यावेळी मंडळ कृषी अधिकारी पाटोदा जनार्दन क्षिरसागर, कानिफनाथ हुजबंद, साईनाथ कालेकर ,सोमनाथ काळे, रमेश वाडेकर, रावसाहेब पाटील, सागर माळोदे , राम निंबाळकर हे कृषी विभागाचे कृषी सह्ययक उपस्थित होते तर पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ कालेकर यांनी तर सूत्रसंचालन भास्कर नाईकवाडी यांनी केले. यावेळी शेवगे, सातारे पिंपळगाव लेप ,जळगाव नेऊर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.(फोटो २५ जळगावनेऊर)येवला तालुक्यातील सातारे येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कारभारी नवले, राजेंद्र हांडोरे, शेतकरी व कृषी सहाय्यक.