शैलेश कर्पे।लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभागाने शेतकºयांना परदेशात विमानाने अभ्यासदौºयाची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी शेतकºयांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्य पुरस्कृत योजनेत शेतकºयांना या दौºयामुळे विमानाने परदेशवारी लाभणार असून, त्याचा निम्मा खर्च राज्य शासन उचलणार आहे. गॅट कराराद्वारे जगात मुक्त अर्थव्यवस्था मान्य करण्यात आली. राज्यातील शेतकºयांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाºया शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकºयांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडित घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकºयांपर्यंत त्यांच्या गरजेनुरूप योग्यवेळी पोहचविणे आणि त्यासाठी आवश्यक साहाय्य व सोयीसुविधा पुरविणे निकडीचे आहे.कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकºयांना आधुुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता विविध उपाययोजनांसाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकºयांचा या परदेश अभ्यासदौºयाचे नियोजन करण्यात आले आहे.
शेतकरी करणार विविध देशांचा दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 1:11 AM