पिळकोस : शेतातून ट्रॅक्टरने कांद्याची शेवटची ट्रिप घरी नेत असताना उताराला ट्रॉलीचा हुक तुटून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. त्यात गोरख शिवाजी जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.गोरख अल्पभूधारक शेतकरी असून, स्वत:च्या शेतीव्यतिरिक्त दुसºया शेतकºयाची शेती करतात. बुधवारी वाट्याने करत असलेल्या गव्हाळी शिवारातील शेतातील कांदा घरी वाहत असताना गिरणा नदीकाठच्या कसाड शिवारातून कांद्याने भरलेला ट्रॅक्टर घरी घेऊन जात असताना उताराला ट्रॉलीचा हुक तुटल्याने टॅÑक्टरवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर खाली आला. त्यामुळे डोक्याला गंभीर मार लागल्याने गोरख यांचा मृत्यू झाला.गोरख जाधव यांचा मोठा मुलगा आर्मीत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर.एस. सोनजे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जगन्नाथ सोनजे करीत आहेत.सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घरी जाताना सदर घटना घडली. त्यावेळी पत्नी व मुलगा मोटारसायकलने जात होते. त्यांनी आरडाओरड केली असता शेजारील शेतकरी दीपक जाधव व समाधान आहेर यांनी धाव घेतली. गोरख जाधव यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन करून त्यांच्यावर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ट्रॅक्टरखाली दबल्याने शेतकरी जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 1:06 AM
पिळकोस : शेतातून ट्रॅक्टरने कांद्याची शेवटची ट्रिप घरी नेत असताना उताराला ट्रॉलीचा हुक तुटून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. त्यात गोरख शिवाजी जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देडोक्याला गंभीर मार लागल्याने गोरख यांचा मृत्यू