भाऊसाहेब काकळीज यांची न्यायडोंगरी महसुली शिवारात नांदगाव रोड लगत कोल्ली नाल्याच्या दोन्ही बाजूला शेती असून त्यात कांदा, कपाशी ,मका ही पिके अत्यंत जोमदार आलेली होती. परंतु गेल्या तीन-चार दिवसात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे परिसरातील सर्वच नदी नाले यांना प्रचंड पूर आल्याने नदी काठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात काकलीज यांची शेती नाल्याचे दोन्ही बाजूंनी असल्याने त्यांचे ऐन बहरात आलेले कांदा, मक, कपाशी ही नगदी पिके पूर्णतः नष्ट झाली. त्याचबरोबर शेतातील माती ही मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्याचे साधनच कायमस्वरूपी हिरावल्या गेल्याची भावना निर्माण झालेल्या मंदाबाई हिने हे टोकाचे पाऊल उचलले व शेतातील राहत्या घरीच विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.
मंदाबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सासू, सुना नातवंडे असा परिवार आहे.
फोटो- १० मंदाबाई काकळीज