येवला : येथील बाजार समितीच्या येवला व अंदरसूल उपबाजारात लाल कांद्याची २० हजार क्विंटल आवक झाली असून, गेल्या सहा दिवसात भाव ११०० रुपये प्रतिक्विंटल घसरल्याने शेतकरी चिंंतित झाले आहेत. आठ दिवसांपूर्वी कांद्याला १७०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. लाल कांद्याचा भाव तेजीत राहील, असा जाणकारांचा अंदाज होता. शेतकरी आनंदात असताना अपेक्षेपेक्षा अधिक कांदा बाजारात दाखल होत असल्यामुळे भावात घसरण झाली आहे. आणखी कांद्याचे भाव कमी होतील. चालू असलेला भाव पदरात पडून घ्यावा, या आशेने शेतकरी वेगाने कांदा मार्केटला आणू लागल्याने आवक मोठ्या प्रमाणावर वाढली, त्याचा परिणाम भाव कमी होण्यावर झाला. १५ नोव्हेंबरला २०१७ दरम्यान लाल कांद्याने मार्केटमध्ये प्रवेश केला तरीदेखील भाव टिकून होते. मात्र चालू आठवड्यात कांदा घसरणीला लागला आहे. शुक्रवारी येवला व अंदरसूल बाजार आवारात ८०० ट्रॅक्टरमधून सुमारे १६ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. येवला बाजार आवारात लाल कांद्याला किमान ३०० रुपये, कमाल ८२६, तर सरसरी ७७० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ही भावातील लक्षणीय घसरण आहे. कमी प्रमाणात आवक असलेल्या उन्हाळी कांद्याला किमान ३०० रुपये, कमाल ८३९ रुपये, तर सरासरी ७२५ रुपये भाव मिळत आहे. अंदरसूल उपबाजारात लाल कांद्याला किमान ५०० रुपये, कमाल ८२५, तर सरासरी ७०० रुपये भाव मिळत आहे. उन्हाळ कांद्याला किमान ५०० रुपये, कमाल ८१३ रुपये तर सरसरी ७२५ रु पये भाव मिळत आहे.
शेतकरी चिंतित : येवला बाजार समितीत २० हजार क्विंटल आवक कांदा ११०० रु पयांनी घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:08 AM
येवला : येथील बाजार समितीच्या येवला व अंदरसूल उपबाजारात लाल कांद्याची २० हजार क्विंटल आवक झाली असून, गेल्या सहा दिवसात भाव ११०० रुपये प्रतिक्विंटल घसरल्याने शेतकरी चिंंतित झाले आहेत.
ठळक मुद्देआठ दिवसांपूर्वी कांद्याला १७०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल भाव चालू आठवड्यात कांदा घसरणीला लागला