नाशिक : इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच कृषी क्षेत्रातही नवनवे तंत्रज्ञान येत आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार शेतकऱ्यांनी केला तर त्यांची आर्थिक उन्नती होईल आणि त्यांच्यावर आत्महत्त्या करण्याची वेळ येणार नाही, असे मत गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ संचलित कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २५ ते २९ जानेवारी या कालावधीत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ डोंगरे वसतिगृह मैदानावर करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी हे मत व्यक्त केले. गुरुमाउली अण्णासाहेब यांच्या बरोबरच महापौर अशोक मुर्तडक, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, महेश हिरे, मनपा स्थायी समिती सभापती सलीम शेख, चंद्रकांत मोरे, कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे उपस्थित होते.
नव्या तंत्रज्ञानातूनच शेतकऱ्यांची उन्नती
By admin | Published: January 17, 2017 1:45 AM