नाशिक : पुनतांबे येथील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 1 जूनपासूनच्या शेतकरी संपाच्या माध्यमातून राज्यभरात उभे राहिलेल्या आंदोलनात विविध टप्प्यावर चढउतारानंतर अखेर उभी फूट पडली आहे. पुनतांब्यांच्या समितीने 3 जूनच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसोबत संपातून माघार घेतल्यानंतरही नाशिकच्या शेतकऱ्यांनी पुढे हा संप पुढे नेटाने चालवत सूकाणू समितीची स्थापना केली होती. पंरतु, आता नाशिकमधीलच एका गटाने 1 जानेवारी 2018ला सूकाणू समितीच्या राज्यस्तरीय बैठकीचे नियोजन केले असताना दुसऱ्या गटाने सूकाणू समितीती विसर्जित करीत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आंदोलनाचे केंद्र बनलेल्या नाशिकमधूनच शनिवारी (दि.30) शेतकरी आंदोलनात उभी फूट पडली आहे.पंडित कॉलनीत झालेल्या बैठकीत सुकाणू समिती सदस्य हंजराज वडघुले, अमृता पवार, चंद्रकांत बनकर कैलास खांडबहाले यांनी विविध शेतकरी संघटनांसह सामाजिक संघटनांची बैठक घेऊन सूकाणू समिती विसर्जित करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. तसेच औरंगाबाद येथील बैठकीत झालेल्या 1 मार्चपासून संप पुकारण्याच्या निर्णयालाही या बैठकीत विरोध करण्यात आला आहे. पुणतांबे येथील येथील शिष्ट्मंडळाने शासनाशी केलेली तडजोड मान्य न झाल्याने नशिक येथील संयोजने समितीने निर्णायक बैठक घेऊन शेतकऱ्यांचे आंदोलन पुढे नेण्याचा आणि या आंदोलनाचा राज्यव्यापी करण्याचा निर्धार करीत 5 जून 2017 रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून सूकाणू समितीची स्थापना केली होती. या समितीच्या प्रयत्नातू शासनाला अंशता का होईना कजर्मुक्ती देण्यास भाग पाडल्याचा दावा या समितीच्या सदस्यांनी केला आहे. परंतु, नजिकच्या काळात सुकाणू समितीचे कामकाज दिशाहीन झाल्याची कबुलीही देत समितीच्या सदस्यांनी मूळ संयोजन समिती, कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता काही ठराविक संधीसाधू व्यक्ती निर्णय जाहीर करीत असल्याने आंदोलनाची मूळ संयोजन समिती म्हणून राज्याची सूकाणू समिती विसर्जित करण्यात आल्याचे घोषित केले.