नाशिक - इडा, पिडा टळणार आहे, बळीचं राज्य येणार आहे. कमानेवाला खाएगा लुटनेवाला जाएगा नया जमाना आएगा अशा घोषणा देत बलिप्रतिपदेच्या दिवशी नाशिक तालुक्यातील सिध्द पिंप्रि आणि निफाड तालुक्यातील थेरगाव येथे स्वतंत्र भारत पक्ष आणि शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यातीने सरकारचा प्रतिकात्मक पुतळा गाडून मुठमाती आंदोलन करण्यात आले.
निफाड तालुक्यातील थेरगाव येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे यांच्या नेतृत्वाखाली सरकारी धोरणांचा विरोधात मुठमाती देण्यात आली. कार्यक्रमास शंकर पुरकर, रामकिसन बोंबले, शामराव कदम, किरण गवारे, व्यंकट गवारे, संतोष पाटील बोराडे, दगुपाटील गवारे, नामदेव बोराडे, एकनाथ धनवटे, सोपान बोराडे, रमेश धनवटे, प्रशांत कदम, हरिभाऊ मोगल, धनाजी गायकवाड आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
सिध्द प्रिंप्री येथे सकाळी दहा वाजता एका शेतात वामन रुपी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मूठ माती आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित शेतकरी संघटनेचे रामनाथ ढिकले , भानुदास ढिकले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले, आनंदा ढिकले , भाऊसाहेब बाळकृष्ण ढिकले , राहुल ढिकले , अंबादास ढिकले दौलत , ढिकले, शरद ढिकले, सरपंच मधुकर ढिकले आदींसह शेतकरी उपस्थित होते.
देशात आजपर्यंत वेगवेळ्या पक्षांची सरकारे आली पण वामनरुपी सरकार उध्वस्त करण्याचा कोणत्याही सरकारने प्रयत्न केला नाही. उलट ती मजबुत करीत वेगवेगळे कायदे वापरुन शेतील मालाचे भाव पाडून शेतकऱ्यांचा बळी दिला. म्हणून बलिप्रतिपदेच्या दिवशी वामनरुपी सरकार नावाच्या व्यवस्थेला गाडून मुठमाती देउन बळीराज्य आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.