देवळा : वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी करत नाराजी व्यक्त केल्याने वीज वितरण कंपनीच्या कारभारात सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. देवळा येथे विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर तक्रारींचा पाऊस पाडला. खडकतळे, तिसगाव, गिरणारे येथे कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली. वितरण कंपनीबाबत येणाºया तक्रारी पाहता गुरुवारी (दि.२०) वीज कंपनीच्या अधिकाºयांसह स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.गिरणा उजव्या कालव्याला तीन आवर्तने देण्याची मागणी मेशी, डोंगरगाव येथील सरपंचांनी केली. यावेळी तालुक्यातील पंचायत समिती शिक्षण विभाग, वीज वितरण कंपनी, बांधकाम विभाग आदी विभागांविषयी तक्रारी करण्यात आल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी बैठकीचे निमंत्रण नसल्यामुळे निषेध व्यक्त करून सभात्याग केला. यावेळी प्रभारी प्रांत अधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर, यशवंत सिरसाठ, मुख्य अधिकारी संदीप भोळे, सहायक निबंधक सुजय पोटे, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, पंचायत समितीच्या सभापती शांताबाई पवार, उपसभापती धर्मा देवरे, केशरबाई आहिरे आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. चिंचवे व डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असलेली शिक्षकांची पदे तसेच तालुक्यात पशुधन अधिकाºयांची रिक्त असलेली पाच पदे भरण्याची मागणी करण्यात आली.तालुक्यात ग्रामसेवक व तलाठी यांची काही पदे रिक्त असल्यामुळे दोन ते तीन गावांचे काम एका कर्मचाºयास पहावे लागते. यामुळे मोठी गैरसोय होते. या कर्मचाºयांची इतर गावांत प्रभारी नेमणूक करताना त्यांचे त्या गावातील कामकाजाचे दिवस ठरवून देण्याची सूचना आमदार आहेर यांनी केली.घरकुल योजनांची उद्दिष्ट्ये दिली जात नसल्याची सरपंच दयाराम सावंत यांनी तक्रार केली. गटविकास अधिकारी देशमुख यांनी यासंबंधी प्रस्ताव दाखल नाहीत असे सांगितले. यावर पंचायत समिती योजनांची उद्दिष्ट्य ग्रामपंचायतींना देणार नसेल तर प्रस्ताव कोठून दाखल होतील, असा सवाल करत आमदार आहेर यांनी पंचायत समितीच्या अधिकाºयांना धारेवर धरले. यशवंत सिरसाठ यांनी आभार मानले.सिंगल फेज योजना राबविण्याची मागणीमेशी व देवपूर पाडे शिवारात सिंगल फेज योजना राबविण्याची मागणी करण्यात आली. निविदा काढूनही वीज कंपनी खांब देत नसल्यामुळे दूर अंतरावरून केबल टाकून वीजपंप चालवावे लागतात. रोहित्र जळाल्यानंतर नवीन रोहित्र वेळेवर मिळत नाही, अशी तक्र ार चिंचवेचे सरपंच रवींद्र पवार यांनी केली. फेबुवारी व एप्रिल महिन्यातील सिंचनाची दोन आवर्तने दिल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पाण्यावर तिसरे आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी दिली. नागील नाला ते मेशी पाझर तलाव क्र . १ पोटचारीस मान्यता मिळावी, अशी मागणी केदा सिरसाठ यांनी केली. कृषी विभागाचे कृषी सहायक हे ग्रामसभांना उपस्थित राहत नसल्याची तक्र ार करण्यात आली.
वीज कंपनीवर शेतकरी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:29 PM
वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी करत नाराजी व्यक्त केल्याने वीज वितरण कंपनीच्या कारभारात सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. देवळा येथे विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
ठळक मुद्देदेवळा तालुका आढावा बैठक : शेतकरी आक्रमक; तीन आवर्तनाची मागणी