शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

शेतकरी भयभीत : डाव्या कालव्याच्या ‘कॉरिडोर’मध्ये बिबट मादीचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 5:22 PM

नाशिक : महादेवपूर ते थेट मेरीपर्यंत डाव्या कालव्याचा परिसर बिबट्या , तरस, रानमांजर यांसारख्या वन्यजिवांचा ‘कॉरिडोर’ म्हणून ओळखला जातो. ...

ठळक मुद्देगैरकृत्यातून असुरक्षिततेची जाणीव नकोवनविभागाच्या पथकाने पाहणी करून पिंजरे तैनात केले ‘कॉरिडोर’मध्ये भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव

नाशिक : महादेवपूर ते थेट मेरीपर्यंत डाव्या कालव्याचा परिसर बिबट्या, तरस, रानमांजर यांसारख्या वन्यजिवांचा ‘कॉरिडोर’ म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षीदेखील जानेवारी ते फेब्रुवारीच्या कालावधीत बिबट मादीचा पिलांसह या कॉरिडोरमध्ये मुक्त संचार येथील शेतकरी रहिवाशांना आढळून आला होता. यावर्षी पुन्हा बिबट मादीने मागील पंधरवड्यापासून चांदशी-मखमलाबाद शिवारात मुक्त संचार करण्यास सुरुवात केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

शहरापासून लांब व नैसर्गिक लपण असलेला परिसर म्हणून डाव्या कालव्याची ओळख आहे. गंगापूर धरणापासून सुरू होणारा डावा तट कालवा महादेवपूर, जलालपूर, चांदशी, मखमलाबाद, मेरीमार्गे पुढे जातो. महादेवपूरपासून थेट मेरीपर्यंत या कालव्याच्या परिसरात वृक्षराजी काटेरी झुडपे गवताचे साम्राज्य असल्यामुळे बिबट्यासारख्या वन्यजिवांसाठी हा परिसर सुरक्षित नैसर्गिक अधिवास ठरतो. कारण अधूनमधून कालव्याला आवर्तनांमुळे पाणी असते व आवर्तन बंद झाल्यानंतरही काही दिवस कालव्यात पाण्याचे डबके साचून असतात त्यामुळे वन्यजिवांची या भागात सहज तहान भागते. मागील काही महिन्यांपासून कालव्याच्या या ‘कॉरिडोर’मध्ये भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव वाढला आहे. यामुळे बिबट्याच्या खाद्याचाही प्रश्न सुटला आहे. तसेच शेतकऱ्यांचे पशुधनदेखील असुरक्षित पध्दतीने या भागात असल्याचे दिसूून येते. यामुळे गंधारवाडी ते मखमलाबाद फाट्यापर्यंत बिबट्याचा संचार पंधरवड्यापासून येथील शेतकºयांना अधिक जाणवत आहे. बिबट मादीचा संचार वाढल्याने शेतक-यांमध्ये दहशत पसरली आहे. पिलांसह मादी कालव्याच्या परिसरात वावरत असून, अनेकांना तिने दर्शन दिले आहे. बिबट मादीचा आढळून आलेला वावर आणि लोकवस्ती व मळे परिसर बघता वनविभागाच्या पथकाने पाहणी करून संभाव्य मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी या परिसरात पिंजरे तैनात केले आहेत. तसेच नियमित गस्तही सुरू करून बिबट्याच्या वास्तव्याच्या खुना शोधून त्यानुसार पिंज-यांची जागा बदल करण्यात येत आहे.गैरकृत्यातून असुरक्षिततेची जाणीव नकोबिबट मादीने अद्याप कुठल्याही प्रकारे उपद्रव माजविला नसून, नागरिकांनी संयम बाळगून खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे वनविभागाचे म्हणणे आहे. बिबट मादी किंवा तिच्या पिलांना असुरक्षिततेची जाणीव होईल, असे कुठलेही गैरकृत्य नागरिकांनी टाळावे. दोघांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे; कारण तसे झाल्यास मादी आक्रमक होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सावधगिरीने ही परिस्थिती वनविभागाकडून हाताळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :leopardबिबट्याwildlifeवन्यजीवNashikनाशिकforest departmentवनविभाग