देवळा : सध्या शेतात खरीप व रब्बी हंगामातील विविध प्रकारची पिके घेताना शेतकऱ्यांपुढे शेतात निर्माण होणाºया तणांची मोठी समस्या निर्माण झाली असून, पिकांचा नाश करणाºया या तणांचा बंदोबस्त कसा करावा? अशी विवंचना शेतकºयांना दरवर्षी पडू लागली आहे. शेती तोट्यात जाण्याची जी काही विविध कारणे आहेत, त्यात शेतात उगवणारे विविध प्रकारचे तण हे एक प्रमुख कारण आहे.दरवर्षी शेतकºयांना शेतातील तण काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लागतात. यामुळे उत्पादनखर्चात मोठी वाढ होते. याबरोबरच काही शेतकरी मजुरीत बचत करण्याच्या उद्देशाने तणनाशकांची फवारणी करतात, परंतु यामुळे पिकांचेही थोड्या प्रमाणात नुकसान होऊन त्याचा उत्पादनावरदेखील परिणाम होतो, तसेच सतत तणनाशकांची फवारणी केल्यामुळे जमिनीचा पोत खालावतो. पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी बैलांचा वापर केला जात असे. शेतीची सर्व कामे बैलांच्या साह्याने केली जात, ही मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी जास्त कालावधी लागत असल्यामुळे जमिनीला विश्रांती मिळत असे. त्या काळात शेतात तणांचे प्रमाण खूप कमी असे.--------------------------पूर्वी शेताच्या बाजूने मोठे व रु ंद बांध असत, ह्या बांधावर सर्व प्रकारचे गवत, तण उगवत असे. शेतकºयाकडे असलेल्या पशुधनाला या चाºयाचा पुरवठा एक हंगागभर होत असे व उन्हाळ्यात चाराटंचाई निर्माण होत नसे. नंतर शेतकºयांनी हे बांध कोरण्यास सुरु वात करत ते पूर्णपणे नष्ट केले. यामुळे या बांधावर उगवणाºया गवताने बांधावर जागा नसल्यामुळे आता शेतात अतिक्र मण तर केले नाही ना? असे म्हणण्याची शेतकºयांवर वेळ आली आहे. त्याचे दुष्परिणाम शेतात होणाºया तणांच्या रूपात दिसू लागले असून, शेतकरी बिचवा, गाजर गवत, दुधाळी, हरळी आदी विविध प्रकारच्या तणांनी आक्र मण केले आहे. विविध तणांसाठी वेगळी तणनाशक फवारणी करावी लागत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
शेतात वाढणाऱ्या तणांमुळे शेतकरी त्रस्त, तालुक्यात उत्पादनात घट येण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:10 PM