खामखेडा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १०० रुपये अनुदान देण्याच्या निर्णयावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला विक्र ी केलेल्या कांद्याच्या मालावर प्रतिक्विंटल १०० रुपये इतके अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. यात जुलै व आॅगस्ट महिन्यात विक्री केलेल्या कांद्याला अनुदान देण्याचा निकस लावण्यात आला आहे. त्यात फक्त २०० क्विंटलपर्यंत अनुदान मिळणार आहे. यात मुंबई बाजार समिती व इतर राज्यात विक्र ी केलेल्या कांदा या अनुदानातून वगळण्यात आला आहे. या अनुदानासाठी कांदा विक्री पट्टी, सातबारा उताऱ्यावर कांदा लागवड केल्याची नोंद, बॅँक खाते नंबर आदि बाबींचा पाठपुरावा करावा लागणार आहे.वास्तविक सरकारने अडत शेतकऱ्यांकडून न घेता ती माल खरेदीदार व्यापाऱ्याकडून घेण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा माल खरेदीदार व्यापाऱ्यांनी या सरकारच्या विरोधात माल खरेदी बंद करण्यात येऊ मार्केट बंद ठेवण्यात आले होते. यात पुन्हा व्यापारी व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकी होऊन शेतकऱ्याने कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी खुला न आता गोणीत निवडून विक्रीसाठी आणावा, असा तोडगा काढण्यात आला. याला शेतकऱ्यांनी विरोध केला. कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला नाही. यावेळी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन, तहसील कार्यालयासमोर कांदा फेक आंदोलन केले आणि पुन्हा कोणतीही अडत न घेता व ट्रॅक्टर टॉलीत खुला कांदा विक्रीसाठी आणावा, असा निर्णय घेत मार्केट चालू करण्यात आले.मध्यंतरी तब्बल दोन महिने मार्केट बंद - चालूच्या खेळामध्ये चाळीतील कांदा पावसामुळे खराब झाला, तर काही कांदा चाळीतच सडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या अपेक्षने चाळीत साठवून ठेवलेला कांदा विक्री आधी सडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. परंतु या मार्केट कधी चालू तर कधी बंद यात सुमारे सव्वा ते दीड महिना मार्केट बंद राहिले. अजूनही चाळीत कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तेव्हा या अनुदानाचा लाभ कोणत्या शेतकऱ्याला होणार यांची चर्चा आता शेतकरीवर्गात होऊ लागली आहे. (वार्ताहर)
कांदा अनुदानाच्या निर्णयावर शेतकरी नाखुश
By admin | Published: August 31, 2016 10:08 PM