पिंपळगाव बसवंत : जागतिक महामारीच्या संकटाबरोबरच आता शेतकऱ्यांच्या दारात पावसाचे संकट उभे आहे, त्यामुळे काढणीला आलेले गहू, हरभरा व उन्हाळ कांदा या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यात सध्या कोरोना महामारीने थैमान घातले असून त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा ठप्प झाले आहे त्यातच जगाचा पोशिंदा शेतकरी मागील वर्षी झालेल्या अवकाळी व कोरोनाच्या संकटातून सावरत आहे.त्यातच पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटीचा प्रादुर्भाव वाढल्याने दिवसेंदिवस रुग्ण वाढत असून दररोज शेकडो बाधित मृत्यूमुखी पडत आहे. अशा संकटांना सामोरे जात असताना पुन्हा शेतकऱ्यांच्या भवती अवकाळी सारख्या संकटाने ग्रासले असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेली पिके धोक्यात आली आहेत.
पावसाच्या वातावरणाने शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 8:26 PM
पिंपळगाव बसवंत : जागतिक महामारीच्या संकटाबरोबरच आता शेतकऱ्यांच्या दारात पावसाचे संकट उभे आहे, त्यामुळे काढणीला आलेले गहू, हरभरा व उन्हाळ कांदा या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देकाढणीला आलेले गहू, हरभरा व उन्हाळ कांदा या पिकाला मोठा फटका