येवला : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.१३) येवला तहसील कार्यालयासमोर संतू पा. झांबरे आणि महिला आघाडीच्या संध्या पगारे यांच्या नेतृत्वाखाली निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात आले.सरकारने संपूर्ण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज व वीजबिलमुक्ती तातडीने करावी, परतीच्या पावसाने शेतमाल उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्यांना प्रतिएकर ३० हजार व फळबागांना एक लाख रुपयांची मदत द्यावी, विदेशातून शेतमालाची आयात बंद करून निर्यात सुरू करावी, ओलितासाठी कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करावा, शासनाचे हमीभाव खरेदी केंद्रावर सरसकट सर्व मालाची खरेदी करावी, बाजार समिती कायद्यात सुधारणा करून सर्व शेतमाल नियमनमुक्त करावा, वन्यप्राण्यांमुळे शेतमालाचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, मायक्रो फायनान्सचे महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार रोहिदास वारूळे यांना देण्यात आले.बापूसाहेब पगारे, जाफर पठाण, अरुण जाधव, अनिस पटेल, सुभाष सोनवणे, शिवाजी वाघ, विठ्ठल वाळके, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
येवल्यात शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 1:00 AM