शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात केले दाखल
2
“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर
3
“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
5
“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी
6
पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची भन्नाट बॅटिंग
7
सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली
8
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
9
"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं
10
मोठी बातमी : भारतीय संघात अचानक करावा लागला बदल, शिवम दुबे... 
11
'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?
12
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले
13
“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार
14
“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
15
₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला
16
“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला
17
"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,...
18
ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा
19
विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...
20
गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बांधला बंधारा, चार गावांचा दुष्काळ हटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 2:55 PM

नितीन बोरसे*सटाणा : यंदा राज्यात पाऊस कमी पडल्याने दुष्काळाचे सावट असतानाच त्यावर मात करण्यासाठी शेतकºयांनी हेवेदावे आणि गावगाड्याचे राजकारण बाजूला सारून अवघ्या एका महिन्यात लोकसहभागातून ९ ते १० दशलक्ष घनफूट क्षमतेचा बंधारा बांधून कान्हेरी नदीचे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आणि शासनाचा कोणताही निधी खर्च न ...

नितीन बोरसे*सटाणा : यंदा राज्यात पाऊस कमी पडल्याने दुष्काळाचे सावट असतानाच त्यावर मात करण्यासाठी शेतकºयांनी हेवेदावे आणि गावगाड्याचे राजकारण बाजूला सारून अवघ्या एका महिन्यात लोकसहभागातून ९ ते १० दशलक्ष घनफूट क्षमतेचा बंधारा बांधून कान्हेरी नदीचे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आणि शासनाचा कोणताही निधी खर्च न करता ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे अकरा लाख रु पये खर्च करून मातीचा बंधारा बांधून बागलाण तालुक्यातील केरसाणे येथील शेतकºयांनी एक नवा आदर्शही निर्माण केला आहे. बागलाण तालुक्यात यंदा आॅगष्ट महिन्यात पश्चिम भागातील जलाशय पाण्याने भरली असली तरी पावसाने तब्बल एक मिहन्यापासून दडी मारल्यामुळे मध्य ,पूर्व , उत्तर ,दक्षिण बागलाण मधील पिके पाण्याअभावी करपू लागल्याने दुष्काळाचे संकट अधिक गिहरे होत चालले आहे.सलग चार ते पाच वर्षांपासून कमी पावसामुळे बहुतांश भागातील बागायती शेती उजाड होत चालली आहे.बागलाण तालुक्यातील कान्हेरी नदी परिसरातील केरसाणे परिसरही याला अपवाद नाही.सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला.त्यातच गावातील राजकीय हेवेदावे गावाच्या प्रगतीला अडथळे निर्माण होऊ लागले.त्यामुळे आधी गावातील एकमेका बद्दल गढूळ झालेली मन जुळविण्याबरोबरच एकमेकातील द्वेष भावना दूर करणे आवश्यक असल्याने त्यासाठी गावातील इंदरिसंग थोरात ,सिव्हील इंजिनियर दिलीप काका मोरे यांनी पुढाकार घेतला.गावातील जुन्या जाणत्या प्रमुख गावकºयांच्या बैठका घेऊन गावाच्या एकजुटीचे महत्व पटवून दिले.या एकजूटीतूनच लोकसहभागची चळवळ रु जवण्याचा प्रयत्न केला आण ित्याला यश देखील आले.----------------------कमी पावसामुळे उजाड झालेली बागायती शेती फुलवून गतवैभव प्राप्त करण्यासाठी थोरात आणि मोरे या जोडगोळीने बाळासाहेब मोरे ,बाळसाहेब अहिरे ,भरत अहिरे ,संजय अहिरे ,देविदास मोरे ,मुरलीधर मोरे ,प्रशांत मोरे ,उत्तम अहिरे ,विष्णू अहिरे यांना एकत्र आणले.सततचा दुष्काळ हटविण्यासाठी गाव नजीकच कान्हेरी नदीवर बंधारा बांधून वाहून जाणारे पाणी अडविण्याची सुपीक कल्पना पुढे आली. शेतकर्यांनी अकरा लाख रु पयांची आर्थिक मदत गोळा करून सुरवातील गावक-यांच्या सहभागातून चा-यांचे खोदकाम करून मातीबांधचे काम सुरु केले.त्यानंतर नदीचे एक किलोमीटर पर्यंत नदीचे खोलीकरणच्या कामास सुरु वात केली.या हे काम सलग महिनाभर चालले.हा मातीचा बंधारा पावसाच्या पाण्याने पूर्ण भरून वाहू लागला आहे.यामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Nashikनाशिक