लोहोणेर : विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याने सन २०१७-१८ च्या गळीत हंगामात ऊसपुरवठा करणाºया शेतकºयांचे पेमेंट चार महिने उलटूनही अद्याप न दिल्याने वसाका कार्यक्षेत्रातील संतप्त शेतकºयांनी वसाकाच्या मुख्य प्रवेशद्वारास व प्रशासकीय कार्यालयाला अखेर कुलूप ठोकले.वसाकाला ऊस देऊन गाळपाला सहकार्य करावे या आवाहनाला प्रतिसाद देत वसाका कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकºयांनी वसाका चालू राहावा म्हणून उसाचा पुरवठा केला. त्यावेळी व्यवस्थापनाच्या वतीने वसाकाही इतर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देईल असे जाहीर करण्यात आले होते. या आशेपोटी परिसरातील शेतकºयांनी वसाकाला ऊसपुरवठा केला. मात्र चार महिन्यांचा कालावधी उलटला तरी पेमेंट न मिळाल्याने ऊसपुरवठा करणाºया शेतकºयांनी कारखान्याचे उंबरठे झिजविण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात वसाका व्यवस्थापनाच्या वतीने तीन टप्प्यांत अनुक्र मे २३०० रु ., १८०० व १००० रु. प्रतिटनप्रमाणे काही शेतकºयांचे पेमेंट करण्यात आले. मात्र चार महिन्यांचा कालावधी उलटूनही काही शेतकºयांना याचा लाभ न झाल्याने आर्थिकदृष्ट्या हतबल झालेल्या संतप्त ऊस उत्पादक शेतकºयांनी आज थेट वसाकाचे कार्यस्थळ गाठले. मात्र, या ठिकाणी कोणीही जबाबदार अधिकारी किंवा प्रतिनिधी उपस्थित नसल्याने संतप्त शेतकºयांनी वसाकाचे मुख्य कार्यालय, कारखाना विभागाचे प्रवेशद्वार व आसवनी विभागाचे प्रवेशद्वार याठिकाणी कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. यावेळी वसाका कार्यक्षेत्रातील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, वसाका बचाव कृती समितीचे प्रभाकर पाटील, बाजार समितीचे माजी संचालक श्रीराम देवरे, नाना अहेर, भास्कर पवार, कडू पवार, संजय निकम, तानाजी निकम, प्रभाकर जाधव, गोपाळ शिंदे, सुधाकर निकम, अण्णा निकम, रामकृष्ण जाधव, कारभारी पवार, कैलास शिंदे, वंजार कोळी, ताराचंद चव्हाण, भास्कर पवार, शशिकांत निकम, कुबेर जाधव, भीमराव पवार, पोपट शिंदे, प्रवीण निकम, धनंजय बोरसे, मनोहर अहेर, अमृत निकम आदी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. वसाकावर २४ रोजी बैठक : अहेरबंद असलेला वसाका अनंत अडचणींना तोंड देत व ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेऊन सुरू केला. मात्र हंगाम सुरू झाल्यानंतर साखरेचे कोसळलेले भाव व आर्थिक मंदी लक्षात घेता ऊस उत्पादकांना पेमेंटबाबत विलंब झाला. मात्र प्राधिकृत मंडळाच्या वतीने शेतकºयांना न्याय देण्याचा कारखान्याचा प्रयत्न असूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतेमंडळींनी काही शेतकºयांना हाताशी धरून वसाकाला कुलूप लावण्याचा चुकीचा निर्णय घेतला. वसाका व्यवस्थापन शेतकºयांचे पेमेंट देण्यासाठी बांधील असून, कार्यालयाला कुलूप ठोकल्याने हे पेमेंट करायचे कसे, असा प्रश्न व्यवस्थापनासमोर उभा राहिला असून, हे कृत्य शेतकºयांच्या दृष्टीने हितकारक नाही. यासंदर्भात येत्या २४ मे रोजी वसाका कार्यस्थळावर ऊसपुरवठा करणारे शेतकरी, सभासद, व प्राधिकृत मंडळाची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल अहेर यांनी दिली.
वसाकाला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:45 AM
लोहोणेर : विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याने सन २०१७-१८ च्या गळीत हंगामात ऊसपुरवठा करणाºया शेतकºयांचे पेमेंट चार महिने उलटूनही अद्याप न दिल्याने वसाका कार्यक्षेत्रातील संतप्त शेतकºयांनी वसाकाच्या मुख्य प्रवेशद्वारास व प्रशासकीय कार्यालयाला अखेर कुलूप ठोकले.
ठळक मुद्देउसाचे पेमेंट न दिल्याने संताप चार महिन्यांपासून थकबाकी, कारखान्याचे उंबरठे झिजवूनही प्रशासनाचे दुर्लक्ष२४ मे रोजी वसाका कार्यस्थळावर शेतकरी, सभासद, व प्राधिकृत मंडळाची बैठक