मानोरी : येवला तालुक्यातील चिचोंडी येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार केला आहे. निमित्त होते समता प्रतिष्ठान संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयात आयोजित साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त समता सप्ताहाचे. अध्यक्षस्थानी सरपंच रवींद्र गुंजाळ होते.यावेळी मुख्याध्यापक रामनाथ पाटील व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर साताळी येथील मच्छिंद्र कोकाटे यांनी रासायनिक पद्धतीने शेती केल्याने मानवी जीवनास किती हानिकारक आहे, यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शालेय समितीचे उपाध्यक्ष सुरेश मढवई, संतोष पळे, देवीदास मढवई, ज्ञानेश्वर पवार, दत्तू मढवई, अशोक विश्वासे, ज्ञानेश्वर पवार, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. आप्पासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर दौलत वाणी यांनी आभार मानले.
चिचोंडी येथील शेतकरी करणार सेंद्रिय शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:57 PM