पंचवटी : शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू असून बहुजन शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला शुक्रवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीने पाठिंबा दिल्याने या बंदचा बाजार समिती व्यवहारावर परिणाम जाणवला. परिणामी शुक्रवारी २५ टक्के शेतमाल आवक घटली होती.शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सभापती देवीदास पिंगळे यांनी बाजारसमिती सुरू ठेवली होती. केंद्राच्या नव्या कायद्यांना विरोध म्हणून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असून ते रद्द करून देशात आधारभूत किमतीचा कायदा करावा अशा मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने बंदची हाक दिली होती. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी बहुजन शेतकरी संघटनेने सर्व बाजारसमित्यांना पत्र दिले होते. आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून बाजार समिती सुरू ठेवण्यात आली. मात्र भारत बंदच्या भीतीने बाजार समितीकडे शेतकऱ्यानी पाठ फिरवली त्यामुळे शेतमालाची जवळपास २५ टक्के आवक घटली होती.इन्फो===शेतकरी नुकसान टाळण्यासाठी निर्णयकोरोना महामारीने शेतकरी होरपळला आहे. अवकाळी पाऊस संकटांना बळीराजा तोंड देत आहे. मात्र बाजारसमिती बंद ठेवली तर त्यांचे नुकसान होण्याची शक्यता होती म्हणून बाजारसमिती सुरू ठेवली.-देविदास पिंगळे, सभापती बाजारसमिती
शेतकऱ्यांच्या बंदने बाजार समितीत आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 1:32 AM