मालेगाव तालुका हा सर्वात अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात प्रमुख पिकांमध्ये लाल कांदा, पोळ कांदा, कपाशी बाजरी भुईमूग, सोयाबीन व कडधान्ये आदी खरिपाची पिके घेतली जातात. या पिकांना मध्यम पर्जन्यमान गरजेचे असते, परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून होणारी अति पर्जन्यवृष्टीमुळे मध्यम पर्जन्यवृष्टीमध्ये येणारी पिके होत नाहीत. अशा वेळी शासनामार्फत पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा जर शेतकऱ्यांना फायदा होत नसेल तर ती योजना काय कामाची, असा सवाल आता केला जाऊ लागला आहे. पुढील पीक रब्बीचे पीक घेण्यासाठी त्याच बरोबर झालेला खर्च वसूल व्हावा या दृष्टीने पीक विमा योजना ही उपयुक्त आहे. पण जर या योजनेमार्फत शेतकऱ्यांची दिशाभूल होत असेल आणि त्यांचा संपर्क होत नसेल तर काय फायदा, असा यक्षप्रश्न शेतक-यांना पडला आहे.
शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 4:15 AM