नांदूरवैद्य : रेल्वे प्रकल्प भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, याप्रकरणी इगतपुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.इगतपुरी ते मनमाड असणाºया रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकºयांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे नुकत्याच रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये बैठका पार पडल्या आहे.येथील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला असून, आज इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव येथील शेतकºयांनी प्रकल्पाला आपला विरोध कायम दर्शवत आज शुक्रवारी (दि. १४) रोजी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव येथील शेतकºयांनी रेल्वे प्रकल्पाला आपला विरोध कायम ठेवत प्रकल्प रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याआधीच शासनाने लष्कराच्या गोळीबार प्रशिक्षणासाठी हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्या असून, आता उर्वरित जमिनीदेखील शासन रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करत असल्यामुळे या परिसरातील शेतकºयांवर उपासमारीची वेळ येईल यामुळे येथील शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.सध्या ज्या उर्वरित जमिनी शिल्लक आहेत त्यावरच अनेकांचा उदरनिर्वाह चालत असून, जर शासनाने हाती असलेली जमीनही रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करत असल्याने आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे कुºहेगाव येथील सर्व शेतकºयांनी निवेदनात म्हटले आहे.यावेळी अंबादास धोंगडे, जगन धोंगडे, भाऊसाहेब सुरेश धोंगडे, संपत धोंगडे, विशाल गव्हाणे, गणेश धोंगडे, ज्ञानेश्वर धोंगडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत येथील शेतकºयांनीदेखील आक्रमकता दाखवत विरोध केला. यावेळी आक्रमक भूमिका घेत सांगितले की, शासन प्रकल्पासाठी जमीन घेणारच आहे तर आधी शेतकºयांशी चर्चा करून योग्य तो मोबदला देण्यात यावा तसेच रेल्वे प्रकल्पास जमिनी देऊन भूमिहीन झालेल्यांना कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेत नोकरी देण्यात यावी. अन्यथा हा प्रकल्प बंद पाडण्यात येईल, अशी आक्रमक भूमिका कुºहेगाव येथील शेतकºयांनी घेतली आहे.
बेलगाव कुºहे व नांदूरवैद्य येथील हजारो हेक्टर जमिनी याआधीच लष्कराच्या ताब्यात गेल्यामुळे येथील अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. त्यातच त्यांच्या मुलांना आजपर्यंत नोकरीत सामावून घेतले नसून आता या प्रकल्पाला आमचा पूर्ण व प्रखर विरोध असून, कुटुंबातील एका सदस्यास रेल्वेत नोकरी देण्यात यावी अन्यथा हा लोहमार्ग बंद करण्यात येईल.- संगीता घोंगडे, सरपंच, कुºहेगाव