नाशिक : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले असून, यापूर्वी फक्त शेतीविषयक बाबींसाठी मदत मिळणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पशुसंवर्धन विभागाच्या अन्य योजनांच्या लाभासाठीही कर्ज वितरित केले जाणार आहे. त्यात पशु खरेदी, गोठा बांधकामासाठीही यापुढे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शेतकºयांना उत्पन्नावर आधारित हमीभाव देण्याबरोबरच त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारने देशभरातील शेतकºयांना आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता अद्याप झाली नसल्याने शेतकºयांचा व्यक्त होणारा रोष पाहता, गेल्या वर्षी केंद्र सरकारने शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये शेतकºयांना पेन्शन देण्याची योजना राबविली. त्यासाठी जे शेतकरी पात्र ठरले त्या सर्वांना किसान क्रेडिट कार्डाचे वाटप करण्यात आले होते.या क्रेडिट कार्डद्वारे शेतकºयांना शेतीसाठी लागणारे बि-बियाणे, खते, शेती अवजारे आदी पूरक बाबींसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात असताना आता केंद्र सरकारने या के्रडिट कार्डाची व्याप्ती वाढविली आहे. फक्त शेतीपुरताच त्याचा मर्यादित लाभ न ठेवता, त्यात आता पशुसंवर्धन विभागाचाही समावेश करण्यात आला असून, शेतीला पूरक पशुसंवर्धनाचा व्यवसाय करू इच्छिणाºया शेतकºयांना त्याचा लाभ होणारआहे.पशुसंवर्धनापासून शेतकºयांना शाश्वत उत्पन्न व स्वयंरोजगाराची निर्मिती करण्यासाठी हे क्रेडिट कार्ड उपयोगी ठरणार आहे. या कार्डधारक शेतकºयास पशू खरेदी, गोठा बांधकाम, गोट फार्म, दूध यंत्रसामुग्री आदी पशुसंवर्धानाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. अधिकाधिक शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी जिल्ह्णातील पात्र शेतकºयांचे राष्टÑीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत खाते असणे आवश्यक आहे. ज्या शेतकºयांचे खाते नसेल त्यांनी तत्काळ खाते उघडणे गरजेचे आहे.२०.४१ कोटी नवीन कार्ड वाटपाचे उद्दिष्टराज्यात सुमारे २० कोटी ४१ लाख शेतकºयांना नवीन किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्याचे उद्दिष्ट बॅँकांना देण्यात आल्याने त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्णातील पात्र शेतकºयांनी तत्काळ बॅँकांशी संपर्क साधून क्रेडिट कार्ड उपलब्ध करून करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णु गर्जे यांनी केले आहे.
किसान क्रेडिट कार्डाची व्याप्ती पशुसंवर्धनापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:43 AM
केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले असून, यापूर्वी फक्त शेतीविषयक बाबींसाठी मदत मिळणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पशुसंवर्धन विभागाच्या अन्य योजनांच्या लाभासाठीही कर्ज वितरित केले जाणार आहे. त्यात पशु खरेदी, गोठा बांधकामासाठीही यापुढे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठळक मुद्देकर्ज मिळणार : पशु खरेदी, गोठा बांधकामाचाही समावेश