शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

डाळिंबावर बुरशीजन्य रोगांमुळे शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 10:52 PM

पाटणे परिसरात मोठ्या प्रमाणात डाळिंब लागवड करण्यात आली असून, चार-पाच वर्षांपासून विविध बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे डाळिंब उत्पादक हतबल झाला आहे.

ठळक मुद्देपाटणे : अतिवृष्टीमुळे मृग, हस्त बहार गेला वाया; बागांवर कुºहाड चालवण्याची वेळ

राजेश माळी ।पाटणे : परिसरात मोठ्या प्रमाणात डाळिंब लागवड करण्यात आली असून, चार-पाच वर्षांपासून विविध बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे डाळिंब उत्पादक हतबल झाला आहे.डाळिंबाच्या बागेतून भरघोस उत्पादन मिळून आर्थिक मोबदला चांगला मिळाला. काही शेतकऱ्यांचे चांगले वैभव निर्माण झाले. परंतु गेल्या पाच-सहा वर्षांपासून विविध बुरशीजन्य रोगामुळे संपूर्ण पाटणे परिसरातील डाळिंब उत्पादक संकटात सापडला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे मृग आणि हस्त बहार संपूर्ण पूर्ण वाया गेला. लाखो रूपयांचा खर्च करूनही हाती काहीच लागले नाही. आता पुन्हा आंबिया बहार घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत; परंतु सततच्या बदलत्या हवामानामुळे ाा हंगामातील डाळिंब बहार धोक्यात येऊन शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत. परिसरात दरवर्षी मृगबहार जून महिन्यामध्ये हस्त बहार सप्टेंबर-आॅक्टोबर आंबिया बहार जानेवारी फेब्रुवारी या अशा तीनही हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन घेतले जातात; परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे सततच्या पावसामुळे सततच्या बदलत्या वातावरणामुळे दोन्ही हंगामात कोणत्या प्रकारचे उत्पन्न हाती लागले नाही. आता एक शेवटचा प्रयोग म्हणून पुन्हा एकदा पानगळ करून उत्पादन घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे. तरीसुद्धा सततच्या बदलत्या वातावरणामुळे या हंगामामध्ये सुद्धा अजूनही बाग फुटलेल्या नसून लाखो रूपयांचा खर्च वाया जात आहे. डाळिंब उत्पादक मोठ्या संकटात सापडलेला असून, यातून कसा मार्ग काढावा हे सूचेनासे झाले आहे. भारतात डाळिंबास वर्षभर नियमित फळे लागतात. चांगल्या उत्पादनासाठी झाडांना विश्रांतीची गरज असते म्हणून वर्षातून फक्त एकच पीक घ्यावे लागते. डाळिंबाची लागवड हलक्या किंवा कमी सुपीक असणाºया जमिनीत केली असता सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य वापर करून झाडावर चांगला परिणाम होऊन उत्पादनात वाढ होते.डाळिंबाच्या भरघोस उत्पादनासाठी सर्वसाधारपणे डाळिंबाची लागवड ४.५ बाय तीन मीटर अंतरावर केले तर ३०० ते ३५० झाडे बसू शकतात. उत्तम बाग बनवण्यासाठी झाडाला योग्य आकार वळण देणे महत्त्वाचे असते म्हणून झाडाची छाटणीला खूप महत्त्व असते. डाळिंब उत्पादनात पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. ऋतुमान व झाडाचे वय झाडांची अवस्था यावर ते अवलंबून असते. खत व्यवस्थापनही अतिशय महत्त्वाचा असून कुजलेले खत, शेणखत, रासायनिक खताचे योग्य प्रमाण राखणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे डाळिंब पिकाची रोगप्रतिकारक क्षमता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी सुक्ष्म अन्नद्रव्य खतांचा संतुलित वापर अतिशय महत्त्वाचा ठरतो. डाळिंब झाडांना भरपूर फुलं व फळधारणा होणे कामी हे उपयोगी पडत असते. आज एकरी खर्च जर बघितला १५ हजार रूपये छाटणी, खत लावणे, नळ्या पसरून पाणी देणे, शेणखत कंपोस्टखत १५ हजार रूपये, रासायनिक खते १५ हजार रूपये, सुक्ष्म खते १० हजार रूपये, फवारणी बुरशीनाशक व कीटकनाशक ४० ते ५० हजार रूपये, आंतर मशागत २० हजार रूपये असा जवळजवळ एकरी एक लाखापेक्षा जास्त खर्च करावा लागतो. पानगळी पासून ते तर डाळिंब विक्रीपर्यंत जवळजवळ ४० ते ५० रूपये प्रति किलो असा खर्च असतो आणि एकरी उत्पादन सर्वसाधारणपणे पाच ते सहा टन त्यातून आजच्या भावानुसार दोन लाखाचे उत्पादन मिळू शकते. खर्च वजा जाता फारसा पैसा हाती लागत नाही. मात्र काहीमोजकेच शेतकरी व्यवस्थापनावर जवळजवळ दीड लाख रूपयांपेक्षा जास्त खर्च करतात आणि उत्पादन जवळजवळ नऊ ते दहा टन असं मिळवतात. योग्य व्यवस्थापन व वातावरण चांगले असेल तर डाळिंबाचे भरघोस उत्पादन मिळू शकते; परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे सततच्या बदलते वातावरण यामुळे पाटणे गावातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन मिळू शकले नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यातून सावरण्यासाठी शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ पीक विम्याची रक्कम शेतकºयांना देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.बदलत्या हवामानामुळे उत्पादनावर परिणामरोग व किडीचे व्यवस्थापन फळावरील ठिपके फळकूज, मररोग, तेल्या, मावा, तुडतुडे, फुलकिडे (थ्रिप्स), पांढरी माशी, कोळी (माईट) पिठ्या ढेकूण सुरसा होत असतो. यासाठी बुरशीनाशक व कीटकनाशकाची योग्य फवारणी करून डाळिंब उत्पादन भरपूर प्रमाणात घेतले जाते. एकूणच डाळिंबाच्या विकसित जाती, खताची मात्रा, लागवडीचे अंतर, पाणी व्यवस्थापन, योग्य बहाराची निवड, रोग आणि कीड नियंत्रण अशा सर्व क्षेत्रात योग्य नियोजन करूनही सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकरी अपेक्षित असं उत्पादन घेऊ शकत नाही. पर्यायाने शेतीचे नियोजन बिघडलं. डाळिंब बागा उपटून टाकण्याची वेळ बळीराजावर आली. खास करून बॅक्टेरियल ब्लाईट रोग (तेल्या) रोगामुळे संपूर्ण बागा नष्ट होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला. अनेक उपाययोजना करूनही डाळिंब बागा वाचवण्यात अपयशी ठरले. पर्यायाने शेतीचे नियोजन बिघडले. डाळिंबबागांवर कुºहाड चालवण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती