देवळा : शासनाने कांदा अनुदानाचा कालावधी ३१ जानेवारीपर्यंत वाढवून दिल्याने त्या कालावधीत बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतक-यांकडून अर्ज भरून देण्यासाठी गर्दी होत आहे.राज्यात आॅक्टोबर २०१८ नतर कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडून त्यांना नुकसान सोसावे लागत होते. त्या पार्श्वभूमीवर शासनाने बाजार समित्या तसेच खाजगी बाजार समितीमध्ये दि. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतक-यांना २०० रु पये प्रति क्विंटल, व प्रती शेतकरी जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्यासाठी या प्रमाणात अनुदान मंजूर करण्यात आले होते. परंतु १५ डिसेंबर २०१८ नंतरही कांद्याला मिळणारे बाजारभाव कमी असल्याने कांदा अनुदानाचा कालावधी वाढवण्याची मागणी शेतकरी, शेतकरी संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. त्या अनुषंगाने कांदा अनुदानाचा कालावधी दि. ३१ डिसेंबरपर्यंत वाढवून देण्यात आला होता. परंतु नंतर हि मुदत ३१ जानेवारी २०१९ पर्यंत वाढवण्याचा शासन निर्णय झाल्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.आणखी मुदतवाढीची मागणीअद्यापही पोळ कांद्याचे बाजारभाव कोसळलेले असून जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात बाजारात हया कांद्याची विकमी आवक झाली होती. जानेवारी महिन्यात कांदा विक्रि केलेल्या शेतक-यांना ३१ जानेवारीपर्यंत अनुदानासाठी मुदतवाढ मिळाल्यामुळे त्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. आर्थिक नुकसान सोसून ज्या शेतक-यांनी फेब्रुवारी महिन्यात बाजार समितीत कांदा विक्र ी केला आहे त्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागणार आहे. यामुळे कांदा अनुदानाची मुदत २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतक-यांनी केली आहे.
कांदा अनुदानासाठी शेतक-यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 5:14 PM
देवळा : ३१ जानेवारीपर्यंत शासनाकडून मुदतवाढ
ठळक मुद्देमुदत ३१ जानेवारी २०१९ पर्यंत वाढवण्याचा शासन निर्णय झाल्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.