सटाणा : बागलाण तालुक्यातील सुमारे ४१ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा व रब्बी हंगामातील पिकांच्या विम्याच्या मुदती संपूनदेखील रक्कम अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेल्या नाहीत. येत्या १५ दिवसांत खात्यावर विम्याची रक्कम तात्काळ वर्ग करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तहसील कार्यालयात बिंदू शर्मा, नामपूर बाजार समितीचे संचालक दीपक पगार, संजय वाघ शिरसमणीकर यांनी तहसील कार्यालयात प्रधानमंत्री पीकविमा व रब्बी हंगामातील विमा योजनेचीर रक्कम मिळविण्यासाठी निवेदन दिले. मात्र शेतकऱ्यांनी सहा हजार रुपये प्रतिहेक्टर तर सरकारी हप्ता ५ हजार रुपये प्रतिहेक्टरी असे ११ हजार व खर्च ५०० रुपये जमा केले आहेत. पीककर्ज काढलेल्या शेतकºयांना विमा काढणे बंधनकारक होते. पिकांचे पूर्ण नुकसान झालेले असताना विमा कंपन्या मात्र गप्प असल्याचे निवेदनात नमूद केलेले आहे. यावेळी श्रीधर कोठावदे, विनोद अहिरे, प्रल्हाद अहिरे, रामचंद्र सूर्यवंशी, रामदास पवार, प्रेमसिंग पवार, सरदारसिंग जाधव, अनिल ठोके, देवीदास बच्छाव, शंकर गांगुर्डे, पुंजाराम मांडवडे, हरी ढेपले, रमेश सोनवणे, गोकुळ सोनवणे, प्रवीण पवार,संजय पवार, सागर जाधव, रमेश खैरनार, सनी शर्मा, धर्मा कुंवर आदी उपस्थित होते.
विमा योजनेपासून शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:16 PM
बागलाण तालुक्यातील सुमारे ४१ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा व रब्बी हंगामातील पिकांच्या विम्याच्या मुदती संपूनदेखील रक्कम अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेल्या नाहीत. येत्या १५ दिवसांत खात्यावर विम्याची रक्कम तात्काळ वर्ग करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ठळक मुद्देसटाणा : रक्कम त्वरित देण्याच्या मागणीसाठी निवेदन