शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 10:22 PM

एकलहरे : लॉकडाउनच्या काळात शेतमाल, भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले. अनेक शेतकºयांना आपला माल कवडीमोल दरात विकावा लागला. त्यात त्यांचा वाहतूक खर्चही सुटला नाही.

एकलहरे : लॉकडाउनच्या काळात शेतमाल, भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले. अनेक शेतकºयांना आपला माल कवडीमोल दरात विकावा लागला. त्यात त्यांचा वाहतूक खर्चही सुटला नाही. शेतकºयांचे अतोनात हाल झाले. अशा परिस्थितीत कुटुंब जगवायचे कसे, याची भ्रांत भेडसावत असताना हिंगणवेढे येथील २० जणांचे एकत्र कुटुंब असलेल्या धात्रक परिवाराने या संकटावर मात करीत यातून मार्ग काढला.हिंगणवेढे येथील शेतकरी निवृत्ती धात्रक यांचे साहेबराव, बाळू, वसंत व संपत आणि त्यांची बायका, मुले मिळून २० जणांचे कुटुंब एकत्रितपणे मळ्यात राहातात. कोरोनाच्या भयंकर संकटाशी सामना करताना त्यांनी ९१ वर्षीय वडिलांच्या सल्ल्याने शेतकामांचे, भाजीपाला विक्रीचे व कुटुंबाच्या खर्चाचे योग्य नियोजन केले. कुटुंबातील सर्व सदस्यांना मास्क वापरून, फिजिकल डिस्टन्स ठेवून काम करण्याच्या सूचना चिरंजीव साहेबराव यांनी दिल्या.त्यांनी टमाटे, कोबी, कांदे यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. मात्र ऐन पिके काढणीच्या वेळेस लॉकडाउन लागू झाला. दरम्यान साहेबराव यांना खासगी कंपन्यांचा आधार मिळाला. शेतमाल चितेगाव फाट्यावरील कंपनीच्या मॉलपर्यंत पोहोचविला. मात्र दर कमी मिळाला. निराश न होता धात्रक कुटुंबाने जिद्दीने कोरोनाचा मुकाबला करत एक आदर्श घडवून दिला आहे. आपल्या शेतमाल विकण्याचे कसब दाखविले.कोरोनाच्या ऐन संकट काळात शेतात टमाटे, कोबी, कांदे एकाच वेळी काढणीस आले. आमच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच होत असल्याने घरातील सर्वच लहान-मोठे कामाला लागले.---------------------------शेतकरी कुटुंबातील सर्वच लागले कामाला४ संचारबंदी, मार्केटबंदी, पोलिसांचा खडा पहारा, कोरोना रुग्णांची वाढतीसंख्या अशा बिकट परिस्थितीला सामोरे जात शेतकºयांनी आपल्या कुटुंबाची मदत घेतली. धात्रक परिवारानेही न डगमगता भाजीपाला खासगी कंपनीला पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्य कामाला लागले.---------------------कोणतीही परिस्थिती जास्त काळ थांबून राहत नाही. प्लेगची साथ आली तेव्हा लस नव्हती. आता कोरोनाची साथ आली, त्यावरही लस शोधण्याचे काम सुरू आहे. हेही दिवस निघून जातील. परिस्थितीचा धिराने व संयमाने सामना करणे एवढेच आपल्या हातात असते.- निवृत्ती धात्रक, शेतकरी हिंगणवेढे--------------------------सुरु वातीला टमाट्याला दहा रु पये प्रतिकिलो, तर कोबीला पाच रु पये प्रतिनग दर मिळाला. कंपनीचे टार्गेट पूर्ण झाल्यावर माल घेणे बंद केले. मार्केट सुरू झाल्यावर शिल्लक माल नाशिक, लासलगाव, पिंपळगाव, सायखेडा येथे विकून मिळेल तो दर पदरात पाडून घेतला. टमाटे, कोबी संपल्यानंतर आम्ही कांदा विक्र ीचे नियोजन केले.- साहेबराव धात्रक, शेतकरी

टॅग्स :Nashikनाशिक