राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. रोहिणी नक्षत्रात थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसावर तांबट असलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. परंतु या पेरणी केलेल्या पिकांना पावसाची नितांत गरज असून शेतकरी वर्ग सध्या मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडला आहे. दरम्यान, यंदा कपाशी पिकाकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. कपाशीला बोंडअळीने उत्पादन व खर्च यात ताळमेळ बसत नसल्याने कपाशी पिकाकडे पाठ फिरविल्याचे दिसते. त्याऐवजी मका पिकाला पसंती दर्शविली आहे.
शेतकऱ्यांनी महागड्या बी-बियाण्यांची पेरणी केली गेली आहे. राजापूरचा काही भाग हा तसाच पेरणीविना बाकी असल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी पेरणी केलेली पिके कोळपणीला आलेली आहेत. शेतकऱ्यांनीही मका पिकाला पसंती दिली आहे तर कपाशीकडे पाठ फिरविली आहे. बऱ्याची ठिकाणी काळ्या रानात शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र ओलेत्या अभावी या काळ्या रानातील पेरणी दुबार होणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ज्यांनी नशिबावर हवाला ठेवून पेरणी केली त्यांची पिके आता आता १५ दिवसांची झाली असून आता होणाऱ्या पेरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत पडणार आहे. शेततळे असलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली आहे. मृग नक्षत्र संपत आले तरी पाऊस झाला नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
इन्फो
नगदी पिकाकडे लक्ष केंद्रित
कपाशी पिकामुळे शेतात फक्त एकच पीक होते व त्याच शेतात मका लागवड केली तर शेत लवकर रिकामे होऊन तेथे रब्बीच्या हंगामातील पीक घेता येते. राजापूर व परिसरात मागे पाच ते दहा वर्षापूर्वी शेतकरी कपाशी पिकाकडे वळले होते. पण मागील दोन वर्षांपासून कपाशीवर बोंड अळी रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे व कपाशीचे उत्पादन घटत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशी लागवड क्षेत्रात घट केली आहे. यंदा कोरोनामुळे आर्थिक गणित कोलमडल्यानेही शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे लक्ष वळवले आहे.
कोट.... यंदा खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी वर्गाने मका पिकाला पसंती दिली आहे. शेतकरी मका बियाणे खरेदी करताना दिसत आहेत. सध्या मका पिकाला खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा उपलब्ध होतो व उत्पन्न चांगले येते. कपाशी पिकाला औषधावर खर्च जास्त होतो व चारा होत नाही. खर्च जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे यावर्षी मका पिकाचे क्षेत्र वाढणार आहे.
- अशपाक सय्यद, कृषी दुकानदार, राजापूर
कोट.... राजापूर व परिसरातील शेतकऱ्यांचे कपाशी पीक हे अत्यंत महत्त्वाचे समजले जात होते. पण मागे सलग दोन वर्षापासून बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली आहे. राजापूर येथे काही पेरण्या झाल्या आहेत तर अजून निम्म्याहून अधिक पेरण्या बाकी आहेत. आधीच्या पेरण्यांची कोळपणी सुरू झाली आहे.
- समाधान आव्हाड, शेतकरी, राजापूर
फोटो- २१ राजापूर क्रॉप राजापूर येथे मका पिकाची सुरू असलेली कोळपणी.
===Photopath===
210621\0107561321nsk_10_21062021_13.jpg
===Caption===
फोटो- २१ राजापूर क्रॉप राजापूर येथे मका पिकाची सुरू असलेली कोळपणी.