येवला : कांद्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांदा दरात होत असलेल्या घसरणीने उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहे.कांद्याचे वाढते दर व तेही टिकून राहिल्याने यंदा येवला तालुक्यात हजारो हेक्टरवर उन्हाळ आणि लाल कांद्याची लागवड झाली आहे. कांदा काढणीला आला आणि कांद्याच्या दरात घसरण सुरू होत गेली. त्यात कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाउन व संचारबंदी लागू झाल्याने बाजारपेठा बंद पडल्या. वाहतूक सुविधाही ठप्प झाली. परिणामी शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडून राहिला. बाजार समित्या चालू बंद होत असल्याने शेतकरी अधिकच अडचणीत आला. मिळणाºया बाजारभावाने कांदा उत्पादन खर्चही फिटेना. लाल कांद्याला तर प्रतिक्विंटल अवघा २०० रुपये भाव मिळतो आहे. कोरोना पाठोपाठ ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने अधिकच भर पडली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अधिकच धास्तवला. काही शेतकरी मंडळींनी कमी दरात कांदा विकण्याऐवजी आता चाळीत कांदा साठविण्यास सुरुवात केली आहे.कोरोनामुळे शेतमाल दरावर विपरीत परिणाम झाला आहे. कांदा विक्रीतून उत्पादन खर्चदेखील फिटत नसल्याने आर्थिक अडचणीत भर पडली आहे. कांदा दरवाढीची शक्यता नसल्याने शासनाने कांद्याला हमी भाव ठरवून देणे गरजेचे आहे.- विजयकांत पठाडे, कांदा उत्पादक, रस्ता सुरेगाव
घसरत्या कांदा दराने शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 10:28 PM
येवला : कांद्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांदा दरात होत असलेल्या घसरणीने उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहे. ...
ठळक मुद्देआर्थिक कोंडी : संचारबंदीमुळे वाहतूक ठप्प झाल्याने गैरसोय