जळगाव नेऊर : पंधरा हजार रुपयांपर्यंत गेलेला कांदा निर्यातबंदीमुळे आज सरासरी पंधराशे रुपयांवर येऊन ठेपल्याने कांदा उत्पादक शेतकरी कोंडीत सापडला आहे. कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सततच्या दर घसरणीमुळे येवला तालुक्यात कांदा काढणीला वेग आला आहे.महागडी बियाणे व कांदा रोपे खरेदी करून शेतकºयांनी वातावरणातील बदलाचा सामना करून मोठ्या संकटातून कांदा पीक घेतलेले आहे. पण मिळणाºया दरातून खर्चही वसूल होत नसल्याने तसेच कांद्यातून बदलत्या वातावरणामुळे पाहिजे असे उत्पादन निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा आवक होत असून, कांद्याला १५०० ते १८०० रु पये म्हणजे सरासरी १५०० रु पयांच्या आसपास दर मिळत आहे. मागील पंधरवड्यात हाच कांदा तीन हजारांच्या आसपास विकला जात होता. दिवसेंदिवस कांदा दरात घसरण होत असल्याने शेतकरी कांदा दरातील चढ-उतारामुळे चिंतित आहेत. त्यामुळे मिळेल त्या दरात कांदा विक्र ी करून खर्च वसूल करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. शासनाची कर्जमाफीची घोषणा, तसेच अनुदान अद्यापही काही शेतकºयांना न मिळाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. निर्यातबंदी उठविणे गरजेचे आहे. शेतकºयांना दिलासा मिळेल, अशी भावना कांदा उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
राज्यात नवे सरकार आले असून, या सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेण्याची अपेक्षा आहे. सर्वसामान्य जनतेसह शेतकरी जगविण्यासाठी नव्या सरकारने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.- मल्हारी दराडेकांदा उत्पादक, जऊळकेबदलत्या वातावरणामुळे खर्चही फिटेनासा झाला आहे. त्यात खते, औषधे, मजुरी यांची झालेली भरमसाठ वाढ यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न उभा ठाकला आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवून शेतकºयांची हेळसांड थांबवावी.- अरु ण शिंदेकांदा उत्पादक, जळगाव नेऊर