देवळा : वाजगाव येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर गावात पाण्याची सोय व्हावी यासाठी शासकीय मदतीची वाट न पाहता येथील दिपक दामोदर देवरे या शेतकऱ्याने स्वखर्चाने बोअरवेल करून आदर्श निर्माण केला आहे.वाजगावला पाणीपुरवठा करणाºया ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीने तळ गाठल्यानंतर गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. वाजगाव ग्रामपंचायतीने टॅकर मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता.शासनाने गावातील पाणी असलेल्या विहिरीचे अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा व त्यास मंजुरी द्वावी अशी सुचना करून ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव परत पाठवला. गावात पाणीपुरवठा करणाºया विहीरीच्या परीसरातील काही शेतकऱ्यांच्या विहीरींना पाणी असूनही शासन अल्प दराने विहिरींचे अधिग्रहण करते, अशी शेतकºयांची तक्र ार असून त्यांचा विहीर अधिग्रहण करण्यास विरोध आहे.यातून मार्ग काढत उपसरपंच दिपक देवरे यांनी १५ दिवस स्वखर्चाने गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करून गावाची तहान भागविली. परंतु या टँकर बाबतही गावात काही विरोधकांनी अपप्रचार सुरू केल्यामुळे उपसरपंच देवरे यांनी टँकर बंद केला. यानंतर गावात पाण्याची बिकट परीस्थिती निर्माण झाली.पाण्यासाठी गावकºयांना भटकंती करण्याची वेळ आली. त्यावेळी गावातील दिपक दामोदर देवरे हया तरूण शेतकºयाने पुढाकार घेत गावाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून स्वखर्चाने ग्रामपंचायतीला बोअरवेल करून देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मंगळवारी (दि.१९) सायंकाळी बोअरची गाडी बोलावून त्यांनी गावात ५७० फुट बोअर केले. यासाठी देवरे यांना ६० हजार रूपये खर्च आला.गावागावात प्रत्येक गोष्ट हि शासनानेच करावी हि मानसिकता जनतेमध्ये बळावत चालली असतांना दिपक दामू देवरे या शेतकºयाने स्वखर्चाने बोअरवेल करून देत वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला असून टंचाईवर मात करण्यासाठी शासनावर अवलंबून न राहता जनतेने पुढे येण्याची गरज आहे.*** सामाजिक बांधिलकी जपत गावाचे आपण काही देणे लागतो या विचारातून गावाची तहान भागविण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केला.दिपक दामू देवरे, शेतकरी वाजगाव.
गावाची तहान भागविण्यासाठी शेतकऱ्याने स्वखर्चाने दिले ग्रामपंचायतीला बोअरवेल करून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 5:08 PM
देवळा : वाजगाव येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर गावात पाण्याची सोय व्हावी यासाठी शासकीय मदतीची वाट न पाहता येथील दिपक दामोदर देवरे या शेतकऱ्याने स्वखर्चाने बोअरवेल करून आदर्श निर्माण केला आहे.
ठळक मुद्देविहीर अधिग्रहण करण्यास विरोध आहे.