सटाणा : सात महिने उलटूनही संबंधित व्यापाºयांकडून चेक बाउन्सचे कांदा पेमेंट न मिळाल्याने संतप्त झालेल्या ७० ते ८० शेतकºयांनी सोमवारी (दि. २४) येथील बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाला टाळे ठोकून चार तास अधिकारी व कर्मचाºयांना कोंडून ठेवले. दरम्यान पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी शेतकरी आणि व्यापारी यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून आणत नव्वद दिवसांत पेमेंट अदा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. (पान ५ वर)येथील बाजार समितीतील गजानन ट्रेडिंग कंपनीचे संचालक आबा सोनवणे,पप्पू सोनवणे या व्यापाºयांनी गेल्या वर्ष भरात सव्वा चारशे शेतकºयांकडून कांदा खरेदी केला होती. दरम्यानच्या काळात वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे बहुतांश शेतकºयांचे कांदा पेमेंट अदा करण्यात आले तर मोठ्या रक्कमा असलेल्या शेतकºयांचे पेमेंट चेक द्वारे केले होते. परंतु संबधित व्यापाºयांनी दिलेले चेक वटले नाहीत. याबाबत शेतकºयांनी वेळोवेळी बाजार समिती प्रशासनाकडे लेखी तक्र ारी केल्या. प्रशासनाने नोटीसा देऊन खरेदी देखील बंद करण्यात आली होती. दरम्यान सात महिने उलटूनही चेक बाउंसचे कांदा पेमेंट न मिळाल्याने संबधित व्यापाºयांची भेट घेऊन पैशांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी बाजार समितीच्या मध्यवर्ती कार्यालयावरच हल्लाबोल केला यावेळी प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेतकºयांनी एकच गोंधळ घालून मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकत अधिकारी ,कर्मचाºयांना कोंडून ठेवले. तसेच कार्यालयासमोर ठिय्या दिला.नव्वद दिवसात पेमेंटचे आश्वासनआंदोलनामुळे बाजार समितीचे कामकाज ठप्प झाल्याने बाजार समितीचे प्रभारी सभापती सरदारिसंग जाधव ,संचालक तुकाराम देशमुख, केशव मांडवडे ,जयप्रकाश सोनवणे ,संजय बिरारी यांनी शेतकºयांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला . मात्र संतप्त शेतकºयांनी पेमेंट मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली.आंदोलनामुळे कामकाज विस्कळीत झाल्याने बाजार समिती प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली असता नव्वद दिवसात पेमेंट अदा करण्याबाबत लेखी दस्तऐवज करून दिल्यास आंदोलन मागे घेऊ असा प्रस्ताव शेतरकºयांनी ठेवला. तो मान्य झाल्यानंतर आंदोलन तब्बल चार तासांनी मागे घेण्यात आले.चेक बाउन्समुळे थकीत कांदा पेमेंटधारक शेतकºयांनी आंदोलन केले होते. सटाणा पोलीस ठाण्यात शेतकरी, पोलीस अधिकाºयांसमोर स्टम्प पेपरवर नव्वद दिवसांच्या मुदतीत पेमेंट अदा करण्याचे लेखी संबधित व्यापाºयाने दिले आहे. नव्वद दिवसांत पेमेंट अदा न केल्यास शेतकरी न्यायालयाचा मार्ग अवलंबतील.- सरदारसिंग जाधव, प्रभारी सभापती ,बाजार समितीदिल्ली, अहमदाबाद, बडोदा, भरूच येथील व्यापाºयांना कांदा विक्र ी केला आहे. संबंधित व्यापाºयांकडे साडेतीन कोटी रु पयांचे कांदा पेमेंट अडकले आहे. व्यापाºयांनी कांदा पेमेंट देण्यासंदर्भात मुदत दिली आहे. व्यापारी जसे पेमेंट करतील त्या पद्धतीने आम्ही खरेदी केलेल्या कांद्यापोटी पेमेंट अदा करू.- पप्पू सोनवणे, कांदा व्यापारी
कांदा पेमेंटसाठी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 1:54 AM