शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

सायाळे परिसरात तरसाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 1:20 AM

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागातील सायाळे परिसरात गेल्या आठवड्याभरापासून तरसाच्या टोळीने अक्षरश: उच्छाद मांडला आहे. रविवारी सायंकाळी तरसाने हल्ला केल्याने ६५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.जखमी शेतकऱ्यास उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरसाच्या टोळीने अनेक पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्याने सायाळे परिसरातील शेतकºयांमध्ये प्रचंड दहशत निर्माण ...

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागातील सायाळे परिसरात गेल्या आठवड्याभरापासून तरसाच्या टोळीने अक्षरश: उच्छाद मांडला आहे. रविवारी सायंकाळी तरसाने हल्ला केल्याने ६५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.जखमी शेतकऱ्यास उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरसाच्या टोळीने अनेक पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्याने सायाळे परिसरातील शेतकºयांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सिन्नरच्या पूर्वभागातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील सायाळे गाव नेहमीच अवर्षणग्रस्त म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षात या भागात लांडगेवगळता अन्य कोणताही हिंस्र जंगली प्राणी आल्याची घटना ऐकिवात नाही. मात्र गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात ४ ते ५ तसरांची टोळी वावरताना दिसत असल्याचे अनेक शेतकºयांनी पाहिले आहे.  रविवारी सायंकाळी सायाळे शिवारातील थोरात मळ्यात रामचंद्र भिका थोरात हे कोरड्याठाक असलेल्या गवळ नदीजवळ जनावरे चारत असताना अचानक तरसाने त्यांच्यावर हल्ला केला. तरसानेथोरात यांच्या नाकावर गंभीर जखम केली. त्याचबरोबर दोन्ही हातावर तरसाच्या हल्ल्यात गंभीर जखमा झाल्या. थोरात यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. सायाळे व पाथरे सरहद्दीवर असलेल्या बाळू खळदकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर तरसाने हल्ला चढविला. त्यात खळदकर यांचे वासरू गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर नवनाथ थोरात यांची गाय तरसाच्या हल्ल्यात जखमी झाली आहे.दोन तरस पिसाळलेलेगेल्या आठवड्याभरापासून सायाळे परिसरात तरसाची टोळी दिसत आहे. त्यातील दोन तरस पिसाळलेले असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकºयांसह पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढल्याचे शेतकºयांनी सांगितले. वनविभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन तरसांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.गायीने वाचविले मालकाचे प्राणरविवारी सायंकाळी गवळ नदीजवळ जनावरे चारत असताना तरसाने रामचंद्र थोरात यांच्यावर हल्ला केला. यावेळी थोरात यांनी वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. मात्र जवळ कोणीही नव्हते. यावेळी थोरात यांची गाय मदतीला धावली. तिने दोन्ही शिंगात तरसाला उचलून फेकले. त्यानंतर तरसाने गायीवर हल्ला केला. यात गाय जखमी झाली. गायीने मात्र आपल्या मालकाची तरसाच्या तावडीतून सुटका केली. मालकाचे प्राण वाचविणाºया या गायीची परिसरात चर्चा होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी