नाशिक : कृषी उत्पादक कंपन्याबाबत सर्वसमावेशक व व्यापक शेतकरी हिताचे धोरण लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स कंपनी येथे आयोजित कार्यक्र मानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. कृषी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून राज्यभरात अतिशय चांगले काम सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, शेतक-यांना एकत्रित करून काम करणा-या कंपन्यांना बळ देण्यासोबतच या कंपन्यांच्या सहकार्याने सर्वसमावेशक शेतकरी हिताचे धोरण राज्य शासन लवकरच तयार करणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारपेठेचा दर्जा देण्याबाबत विचार करता येईल, असेही त्यांनी सांगितले. द्राक्ष निर्यातदाराकडून द्राक्ष उत्पादक शेतक-यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतक-यांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. देशात वाणांच्या नवीन प्रजाती आल्या तर बाजारपेठ मिळणे सुलभ होणार आहे, त्यादृष्टीने शासन आणि शेतकरी यांना एकित्रत काम करावे लागणार आहे.शेती क्षेत्रात कौशल्य विकासाची आवश्यकता असून कौशल्य विकासाद्वारे शेतक-यांचे सक्षमीकरण करण्यात येईल. त्यासाठी कृषी उत्पादक कंपन्यांची मदत घेण्यात येईल. सौर उर्जेचा वापर वाढविण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगून राळेगणसिद्धी येथे सौरऊर्जेवरील पहिला पथदर्शी प्रकल्प उभा केला आहे, राज्यात याच धर्तीवर सौरप्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कृषी कंपन्यांबाबत शेतकरी हिताचे धोरण लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 5:11 PM
देवेंद्र फडणवीस : मोहाडी येथे शेतकऱ्यांशी साधला संवाद
ठळक मुद्दे सौर उर्जेचा वापर वाढविण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगून राळेगणसिद्धी येथे सौरऊर्जेवरील पहिला पथदर्शी प्रकल्प उभा केला आहे, राज्यात याच धर्तीवर सौरप्रकल्पांची उभारणी करण्यात येणार