नाशिक : पिंपळगाव बसवंत पाठोपाठ टमाट्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गिरणारे गावच्या टमाटा मार्केटमध्ये गेल्या महिना भरापासून बाजारभाव कमालीचे घसरले असून, उत्पादन खर्च निघत नसल्याचे पाहून शेतकºयांनी जनावरेच टमाट्याच्या शेतात सोडून देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान व बांगलादेशाच्या सीमेवर असलेल्या तणावामुळे टमाट्याची निर्यात बंद झाल्यामुळेच भाव घसरू लागल्याची माहिती टमाट्या व्यापारी नसीम अहमद यांनी दिली आहे.नाशिक जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या टमाट्याची बाजारपेठ सध्या मंदीच्या सावटात आहे. सध्या उच्चप्रतीच्या टमाट्याला प्रति के्रट (२० किलो) ४० ते ६० रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच दोन रुपये किलो या भावाने शेतक-यांना टमाट्याची विक्री करावी लागत असून, गेल्या आठवड्यात तर १५ ते २० रुपये प्रति कॅरेट भाव होता. त्यामुळे शेतकरी कमालीचा नाराज झाला असून, टमाटा उत्पादनासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपये भांडवली खर्च करून उसनवारीच्या माध्यमातून शेतक-यांनी टमाट्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. यंदा पाऊस जरी कमी पडला असला तरी टमाट्याचे उत्पादन मुबलक प्रमाणात आले आहे. गिरणारेच्या टमाटा मार्केटमध्ये दिंडोरी, त्रंबक, पेठ, नाशिक, सिन्नर, संगमनेर या भागातील टमाटा विक्रीसाठी येत असतो. पिंपळगाव बसवंतच्या पाठोपाठ गिरणारे मार्केट महत्त्वाचे मानले जाते. परंतु यंदा टमाट्याच्या कोसळलेल्या बाजारभावाचा फटका शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणावर बसला आहे. शेतीची मशागत, लागवड, मजुरी, बी-बियाणे, खाते, कीटकनाशके आदी खर्चही पुरता टमाट्याच्या पिकातून मिळत नसल्यामुळे आगामी काळात टमाट्याचे पीक घ्यावे की नाही अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. या भागातील टमाट्या पाकिस्तान व बांगला देशात निर्यात केला जात असल्याने टमाट्याला यापूर्वी चांगला भाव मिळत होता, परंतु अलीकडे दोन्ही देशांतील दहशतवादी कृत्यांमुळे सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाल्याने आयात-निर्यात बंद केल्याचा फटका टमाट्याला बसला आहे.
शेतकऱ्यांनी टमाट्याच्या शेतात सोडली जनावरे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 3:50 PM
नाशिक जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या टमाट्याची बाजारपेठ सध्या मंदीच्या सावटात आहे. सध्या उच्चप्रतीच्या टमाट्याला प्रति के्रट (२० किलो) ४० ते ६० रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच दोन रुपये किलो या भावाने शेतकºयांना टमाट्याची विक्री करावी लागत असून, गेल्या आठवड्यात तर १५ ते २० रुपये प्रति कॅरेट
ठळक मुद्देमंदीचे सावट : भाव घसरल्याने नैराश्य पोटी उचलले पाऊल