शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

द्राक्ष बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी पेटविल्या शेकोट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 5:11 PM

लासलगाव : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानाचा पारा ७ अंश सेल्सियस पर्यंत खाली घसरल्याने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काढणीला आलेल्या द्राक्षांना तडे जात आहे. हाती आलेला द्राक्ष बाग वाचवण्यासाठी शेतकरी शेतात ऊब निर्माण करण्यासाठी शेकोट्या पेटवू लागले आहेत.

ठळक मुद्देकाढणीला आलेल्या द्राक्षांना तडे जात आहे.

लासलगाव : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानाचा पारा ७ अंश सेल्सियस पर्यंत खाली घसरल्याने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काढणीला आलेल्या द्राक्षांना तडे जात आहे. हाती आलेला द्राक्ष बाग वाचवण्यासाठी शेतकरी शेतात ऊब निर्माण करण्यासाठी शेकोट्या पेटवू लागले आहेत.द्राक्ष हे वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक आहे. शिवाय इतर सर्व पिकांपेक्षा जास्त खर्च होतो. भांडवल जास्त लागते त्यामुळे पीक चांगले यावे आणि आर्थिक फायदा व्हावा यासाठी शेतकरी मोठी कसरत करत असतात. द्राक्षाची पीक हे ऐन थंडीच्या हंगामात बहरण्यास सुरुवात होते, मात्र दक्षिणेकडील अरबी समुद्रात तसेच हिंदी महासागरातील चक्रीवादळाचा जोर असल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात दाखल होत आहे.या गार वाऱ्याचा थेट परिणाम म्हणजे निफाड तालुक्यात सलग तीन-चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे, यामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाणे, वाढ खुंटणे, द्राक्ष कुजणे, द्राक्ष झाडाची मुळे चोकअप होणे, द्राक्ष झाडात साखर उतरण्याची प्रक्रिया पुर्णता थांबणे अशा समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहेया थंडीपासून बचावासाठी द्राक्ष बागांवर अतिरिक्त औषधांची फवारणी केल्यास द्राक्षे निर्यातीला नाकारले जाण्याची भीती असते. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षांना ठिबकद्वारे पाणी देणे, द्राक्ष बागेत विशिष्ट अंतरावर शेकोट्या पेटवून द्राक्षे घडांसाठी उबदार वातावरण तयार करतात यामुळे घड सैल होऊन तडे जाणार नाही, असे द्राक्ष उत्पादकांना वाटत आहे.-----------कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दर वर्षी करावे लागते. यंदा थंडीचे प्रमाण वाढले असून यामुळे आमच्या निर्यातक्षम द्राक्षांवर थेट परिणाम होत आहे. या थंडीतून द्राक्ष बाग वाचवण्यासाठी शेकोट्या पेटुन उब निर्माण करण्याचे कामाला दररोज पहाटे करावे लागत आहे.- सुनील गवळी ,द्राक्ष उत्पादक शेतकरी, ब्राम्हणगाव. (२४ लासलगाव, १)

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती