नायगाव : अतिवृष्टी सारखा पाऊस व सतत बदलणाऱ्या हवामानामुळे खरीप व रब्बीतील कांद्याची पुरती वाट लागली आहे. अशातच कांदा बियाण्यांचा तुटवडा झाल्याने लागवड क्षेत्रात मोठी घट निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कांदा नक्कीच भाव खाणार अशी परिस्थीती निर्माण झाल्याने कांद्यावर उतारा म्हणून शेतकऱ्यांनी आपला मोर्चा सध्या मुळ्याकडे वळवला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यासह तालुक्यात मुळ्यांची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुरवातीला समाधानकारक पडलेल्या पावसाने ऐन सुगीच्या दिवसात अतिवृष्टी सारखा पडल्याने पिकांचे नुकसान केले. या पावसात खरीपातील कांदा रोपांचे व लागवड केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सतत पडणाऱ्या पावसामुळे वारंवार रोपे व लागवड केलेले कांदे खराब झाले. पर्यायाने कांदा बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला. हजार रूपये किलोने मिळणारे कांदा बियाणे पाच हजारांपर्यत पोहचले. या भावातही अनेक शेतकऱ्यांनी रोपे तयार केली, तर काहींनी महागडी रोपे विकत घेऊन कांद्याची लागवड केली. मात्र उसंत दिलेल्या पावसाने पुन्हा परतीच्या रुपाने सतत हजेरी लावत कांद्याचे अतोनात नुकसान केल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.सध्या बाजारात कांद्याला मिळत असलेला भाव व सध्याची अल्प लागवड लक्षात घेता आगामी काळात कांदा नक्कीच भाव खाणार असे चित्र लक्षात घेऊन नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी बीड, अहमदनगर, पुणे व जळगाव आदी ठिकाणाहून महागात रोपे विकत आणून कांद्याची लागवड केली. तर काहींनी चक्क चार हजार रूपये किलोने बियाणे खरेदी करून त्याची पेरणी केली. मात्र यातही सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सध्या शेतकरी हैराण झाले आहे. अशा परीस्थितीत शेतकऱ्यांनी कांद्याला पर्याय म्हणून मुळ्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.
शेतकऱ्यांनी मोर्चा वळवला मुळ्याकडे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 11:10 PM
नायगाव : अतिवृष्टी सारखा पाऊस व सतत बदलणाऱ्या हवामानामुळे खरीप व रब्बीतील कांद्याची पुरती वाट लागली आहे. अशातच कांदा बियाण्यांचा तुटवडा झाल्याने लागवड क्षेत्रात मोठी घट निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कांदा नक्कीच भाव खाणार अशी परिस्थीती निर्माण झाल्याने कांद्यावर उतारा म्हणून शेतकऱ्यांनी आपला मोर्चा सध्या मुळ्याकडे वळवला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यासह तालुक्यात मुळ्यांची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुरवातीला
ठळक मुद्देबदलणाऱ्या हवामानामुळे सध्या शेतकरी हैराण