कळवण : कळवण तालुक्यासह शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नक्षत्र लॉन्स येथे शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांनी हजेरी लावली.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ भारती पवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार जे.पी. गावित, हरिभाऊ पगार, जि.प. चे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती शैलेश पवार, जि.प. चे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती रविंद्र देवरे, पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ गायकवाड, वसाकाचे माजी उपाध्यक्ष शांताराम जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष निंबा पगार, नगरपंचायतचे वैद्यकीय व आरोग्य सभापती अतुल पगार आदी उपस्थित होते. यावेळी आमदार गावीत यांनी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्त्यांनीविकासासाठी पक्ष मतभेद बाजूला सारून या कार्यक्र मांना हजेरी लावल्याबद्दल आभार मानले.अध्यक्षीय भाषणात जि.प.सदस्या भारती पवार यांनी राजकारण बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी व तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी रविंद्र देवरे , शैलेश पवार, रमेश शेवाळे, शांताराम जाधव , भाऊसाहेब पवार, बाळासाहेब गांगुर्डे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्र म प्रसंगी माकपाचे तालुका हेमंत पाटील, किसान सभेचे मोहन जाधव, डॉ पोपट पगार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, गोविंद कोठावदे, वसाका बचाव समतिीचे सुनिल देवरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार , भिला पाटील, राजु पाटील, नगरसेवक मोयोद्दीन शेख, छत्रपती सेनेचे जिल्हाध्यक्ष टिनू पगार आदिवासी सेवक पांडुरंग पाटील, अशोक देशमुख, किरण पगार, गोरख पाटील, अजय पगार, बाजीराव खैरणार, प्रवीण पाटील, माकपा तालुकाध्यक्ष दामू पवार, रशीद शेख, शिवाजी वाळींकर, भरत शिंदे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक हेमंत पाटील यांनी केले.शह-काटशहाच्या राजकारणाची चर्चामेळाव्यात भारती पवार यांनी बोलताना माकपचे आमदार जे.पी. गावित यांच्याकडे निर्देश करत सांगितले, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाआघाडीत माकप महत्वाचा घटक असल्याने वरिष्ठ पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिंडोरी लोकसभा मतदार संघात उमेदवारी मिळविण्यासाठी आपल्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती गावित यांचेकडे केली. पवार यांनी थेट गावित यांनाच साकडे घातल्याने शह-काटशहाच्या राजकारणाची चर्चा रंगली आहे.
कळवणला शेतकरी मेळावा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 4:34 PM
विविध कामांचे लोकार्पण : सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी
ठळक मुद्देआमदार गावीत यांनी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्त्यांनीविकासासाठी पक्ष मतभेद बाजूला सारून या कार्यक्र मांना हजेरी लावल्याबद्दल आभार मानले