शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

मनपाकडून शेतकऱ्यांना अहमदाबाद वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 1:40 AM

स्मार्ट सिटीअंतर्गत मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड म्हणजे नियोजनपूर्वक नगर वसविण्यासाठी शेतकºयांचा विरोध असला तरी त्यातील दोन ते तीन मिळकतदारांनी आपल्या जमिनी देण्याची तयारी दर्शविल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. ग्रीन फिल्डसाठी शेतकºयांना अहमदाबादला लोकप्रतिनिधींनी नेण्यासाठी आता डेडलाइन ठरविण्यात आली असून, लोकप्रतिनिधींनी दाद न दिल्यास प्रशासनच संबंधितांना अहमदाबाद वारीला नेणार आहे.

नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड म्हणजे नियोजनपूर्वक नगर वसविण्यासाठी शेतकºयांचा विरोध असला तरी त्यातील दोन ते तीन मिळकतदारांनी आपल्या जमिनी देण्याची तयारी दर्शविल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. ग्रीन फिल्डसाठी शेतकºयांना अहमदाबादला लोकप्रतिनिधींनी नेण्यासाठी आता डेडलाइन ठरविण्यात आली असून, लोकप्रतिनिधींनी दाद न दिल्यास प्रशासनच संबंधितांना अहमदाबाद वारीला नेणार आहे.स्मार्ट सिटीअंतर्गत मखमलाबाद शिवारात सातशे एकर शिवारात नगरविकास योजना राबविली जाणार आहे. या नियोजनपूर्वक शहरनिर्मितीच्या प्रकल्पासाठी जागा देण्यास स्थानिक शेतकºयांचा विरोध आहे. तसे निवेदन संबंधित शेतकºयांनी अगोदरच महापालिका आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहे. शेतकºयांच्या विरोधामुळे महापालिकेतील सर्वच लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाला विरोध करण्याचे ठरविले आहे. प्रशासनाने यासंदर्भात महासभेवर प्रस्ताव मांडल्यानंतर शेतकºयांचा या विषयाला विरोध असल्याने तो बाजूला ठेवून स्वतंत्र महासभेत त्याचे सादरीकरण करावे त्यानंतर निर्णय घेऊ असे ठरविण्यात आले.दरम्यान, गेल्या महिन्यात नाशिक दौºयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविलेल्या महापालिकेच्या विकासकामांच्या आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली, तेव्हा त्यांनी शेतकºयांना अहमदाबाद येथील अशाच प्रकाराचा प्रकल्प पाहण्यासाठी नेण्याची सूचना केली होती. दरम्यान, त्यानंतर अहमदाबाद दौºयाच्या चर्चा झाल्या असल्या तरी त्याला मुहूर्त लागला नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या पदाधिकाºयांना शेतकºयांना दौºयावर घेऊन जाण्यासाठी ठरावीक मुदत देण्यात येणार असून, त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यास शेतकºयांचे प्रतिनिधी घेऊन प्रशासनच त्यांना वारी घडविणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आयुक्त मुंढे यांच्या दाव्यानुसार त्यांना दोन ते तीन शेतकºयांनी ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंटसाठी जागा देण्याची तयारी केली आहे. तसे झाल्यास काही प्रमाणात कोंडी फुटेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तथापि, मखमलाबाद येथील शेतकरी संघटित करणारे माजी नगरसेवक शरद कोशिरे यांनी मात्र त्याचा इन्कार केला असून, कोणत्याही प्रकारे शेतकरी जमीन देण्यास तयार नसल्याचे कोशिरे यांनी सांगितले.विलंब झाल्यास प्रकल्प रखडेलग्रीन फिल्ड डेव्हलमेंटचे काम अत्यंत किचकट आहे. शेतकºयांनी जमिनी दिल्यानंतरही लगेचच हा निर्णय होणार नाही. नगररचना योजना राबविण्यासाठी अधिसूचना जारी करणे त्यावर हरकती आणि सूचना देणे तसेच शेतकºयांना जमिनीच्या बदल्यात फायनल प्लॉट देणे यासह अन्य अनेक प्रकारची कामे होण्यास खूप कालावधी लागणार आहे. त्यामुळेच प्रशासनाची घाई सुरू आहे.महापालिकेच्या ग्रीन फिल्ड प्रकल्पासाठी कोणीही शेतकरी जागा देण्यास तयार नसून तरीही अशा प्रकारची माहिती प्रशासन देत असेल तर तो शेतकºयांच्या एकीत फूट पाडण्याचा डाव आहे. आयुक्तांच्या सूचनेनुसार अहमदाबाद येथील ग्रीन फिल्ड प्रकल्प पाहण्यास जाण्यासाठी १७ शेतकºयांची नावे तयार करून ती प्रशासनाला देण्यात आली आहेत. मात्र त्यानंतर प्रशासनाने काहीच कळविलेले नाही. अर्थात, दौºयात सहभागी होण्यास शेतकरी तयार झाले म्हणजे शेतजमिनी देण्यास तयार आहोत असा अर्थ घेऊ नये.- शरद कोशिरे, शेतकरी नेता

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFarmerशेतकरी